ओटीटी प्लॅटफॉर्मने नाकारला अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’

अभिनेता अक्षय कुमारचा सुर्यवंशी हा चित्रपटाची प्रदर्शना आधीपासूनच खूप चर्चा आहे. या चित्रपटाची अक्षयचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंहही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. पण हा चित्रपट कुठे प्रदर्शित होणार याची उत्सुकताही चाहत्यांना आहे. २४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आली होती.

अक्षय कुमार स्टारर चित्रपट ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट गुड फ्रायडेच्या दिवशी २ एप्रिल रोजी प्रदर्शित व्हावा अशी निर्मात्यांची आणि दिग्दर्शकांची इच्छा आहे. मात्र, कोरोनाच्या काळात फक्त यावर अवलंबून न राहता निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट रिलीज करू इच्छित आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि रिलायन्स एंटरटेनमेंटची संपूर्ण टीम पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस आणि कार्निवल यांच्याशी चर्चा करीत आहे.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने अक्षयचा चित्रपट खरेदी करण्यास नकार दिला आहे. मात्र का नकार दिला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. लॉकडाउननंतर रिलीज होणारा हा बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट असेल. चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीज झाला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: