मंडई मधील भाजीपाला, गाळेधारक व्यावसायिक करणार आंदोलन

पुणे, दि. 6 – भाजीपाला ,फळ ,पान, तरकारी,पूजा साहित्य व भुसारी विक्रेत्यावर पुणे महापालिका व पुणे मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे.याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व मंडई येथील सर्व विक्रेते 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले.

मंडई येथील व्यावसायिकांवर काही दिवसापासून अन्याय होत असल्याने आज महात्मा फुले मंडई येथिल व्यावसायिकांच्या समस्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आल्या.
मेट्रो च्या आराखडानुसार कार्यवाही करावी , येथील व्यापारी जागा द्यायला तयार आहेत परंतु त्यांचे पहिले पुनर्वसन करावे अशी येथील स्थानिकांची मागणी आहे .मंडई येथील या मध्यमवर्गीय व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या आंदोलनात सहभागी होणार आहे .तसेच या आंदोलनात येथील स्थानिक व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

स्थानिक व्यावसायिक यांच्या मागण्या या आहेत . आहे त्या जागी पुनर्वसन करावे ,भाडेवाढ रद्द करावी ,गाळे दुरुस्ती करावी,रोज स्वछता व साफसफाई करावी, करारनामा रद्द करावा यासारख्या मागण्या त्यांनी यावेळी सांगितल्या.
यावेळी मंडई विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काची, वंचित आघाडीचे नितीन शेलार , भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासुरड्डे , राहुल खोपडे ,संतोष कुदळे ,कमलेश काची ,राजू शहाणे ,महेश जाधव तसेच मंडई येथील सर्व व्यावसायिक आणि पदाधिकारी पत्रकार परिषदेत सहभागी होते.

Leave a Reply

%d bloggers like this: