‘इनोव्हेशन्स अँड कॉपीराईटस् ‘ विषयावर कार्यशाळेस प्रतिसाद

पुणे, दि. ६ – भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘इनोव्हेशन्स अँड कॉपीराईटस् ‘ विषयावरील  एक दिवसीय ऑन लाईन कार्यशाळेस शनीवारी चांगला  प्रतिसाद मिळाला. स्टार्टज्युरीस पुणे चे सहसंस्थापक अभिजीत गिडडे,टिफॅक कंपनीच्या प्रमोदिनी पुंडे यांनी मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी उद्घाटन केले. राज्यातून २८० विद्यार्थी,प्राध्यापक सहभागी झाले. 

‘रोजगार आणि नोकरी मिळविण्यासाठी भविष्यात कल्पकता, नाविन्यपूर्ण संकल्पना महत्वाच्या ठरणार आहेत. मनात आलेल्या चांगल्या संकल्पनांचा कॉपी राईट ,बौद्धिक स्वामित्व अधिकार घेतला पाहिजे. त्याचे संरक्षण केले पाहिजे. मनातील चांगल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे हेही वेगळे कौशल्य आहे. जागतिकीकरणाच्या या कालखंडात संशोधक आणि शैक्षणिक आस्थापनांमध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्काबद्दल जागरूकता असली पाहिजे’,असे प्रतिपादन डॉ आनंद भालेराव यांनी उदघाटन प्रसंगी केले. अभिजित गिड्डे म्हणाले, ‘मनातील चांगल्या कल्पनांचा वेध घेतला पाहिजे. मनातील नकारात्मक गोष्टी काढून टाकून सर्जनशीलतेला वाव दिला पाहिजे. 
प्रमोदिनी पुंडे  यांनी कॉपी राईट दाखल करण्याच्या प्रक्रियेबद्दल सर्व माहिती दिली.   

Leave a Reply

%d bloggers like this: