महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वुमन वॉरिअर’ पुरस्कार

तेजस्वी सातपुते, मोक्षदा पाटील, आरती सिंह, नियती ठाकर-दवे यांचा समावेश

नवी दिल्ली, दि. 2 – कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावलेल्या महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते  ‘कोविड वुमन वॉरिअर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, औरंगाबाद  पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील, अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह, मुंबई पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या 29व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी येथील विज्ञान भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री.जावडेकर यांच्यासह राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा तसेच आयोगाचे इतर सदस्य उपस्थित होते. कोरोना महासाथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या-ज्या महिलांनी विविध क्षेत्रात कर्तव्यपालन केले अशा महिलांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: