डॉ. श्रीकांत दातार, खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल, डॉ. किरण मुजुमदार यांना ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’

पुणे, दि. २९ – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ आज जाहीर करण्यात आले. या वर्षी हा पुरस्कार हार्वेड बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत दातार, लडाख येथील बीजेपीचे तरूण खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल, बॉयोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा पद्मभूषण डॉ. किरण मुजुमदार शॉ, शास्त्रीय गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे आणि फिल्म निर्मात्या व लेखिका पद्मभूषण सई परांजपे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, युएसए येथील जागतिक किर्तीचे व्यावसायिक सल्लागार, लेखक आणि विचारवंत डॉ. राम चरण यांना भारत अस्मिता विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे निमंत्रक राहुल विश्‍वनाथ कराड यांनी दिली.


पुरस्काराचे हे १७ वे वर्ष आहे. प्रत्येकी  सव्वा लाख रूपये रोख,  सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा समारंभ येत्या ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन होणार आहे. विख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा.कराड यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: