इंडोस्‍पेसतर्फे कूल-एक्‍सच्या सहयोगाने खोपोली येथील फार्मा विभागासाठी तापमान नियंत्रित वेअरहाऊसिंग सादर

पुणे – इंडोस्‍पेस ही भारतातील आधुनिक औद्योगिक रिअल इस्‍टेट व वेअरहाऊसिंगची सर्वात मोठी गुंतवणूकदार, विकासक व व्‍यवस्‍थापन कंपनी आणि कूल-एक्‍स ही देशातील सर्वात मोठी फार्मास्‍युटिकल्‍स लॉजिस्टिक्‍स कंपनी व सर्व कोविड लसींच्‍या वितरणामधील अग्रणी कंपनीने महाराष्‍ट्रातील खोपोली येथील फार्मास्‍युटिकल विभागासाठी तापमान नियंत्रित वेअरहाऊसिंगकरिता खास समारोहाचे आयोजन केले. हा समारोह भारतातील फार्मासाठी तापमान नियंत्रित वेअरहाऊसिंग विभागामधील लक्षणीय टप्‍पा ठरला. हा सुरूवातीचा टप्‍पा असला तरी कोविड-१९ लसीकरण उपक्रमांमुळे प्रकाशझोतात आला आहे.

इंडोस्‍पेस व कूल-एक्‍सने देशामध्‍ये सानुकूल जीडीपी/जीडब्‍ल्‍यूपी-प्रमाणित, तापमान-नियंत्रित फार्मा वितरण केंद्रे निर्माण करण्‍यासाठी सप्‍टेंबर २०२० मध्‍ये सहयोग केला. दोन्‍ही कंपन्‍या सहयोगाने २०२१ मध्‍ये पहिल्‍या टप्‍प्‍यांतर्गत मुंबई, दिल्‍ली व बेंगळुरू येथे तीन वेअरहाऊसेस डिझाइन व स्‍थापित करतील. खोपोली वेअरहाऊस हे ३६,००० पॅलेट पोझिशन्‍ससह पहिले वेअरहाऊस आहे आणि भारताचे सर्वात मोठे स्‍वतंत्र तापमान नियंत्रित वेअरहाऊसिंग केंद्र असणार आहे.

एव्‍हरस्‍टोन ग्रुपच्‍या रिअल इस्‍टेटचे उपाध्‍यक्ष राजेश जग्‍गी (इंडोस्‍पेस ही एव्‍हरस्‍टोन ग्रुपची रिअल इस्‍टेट शाखा आहे) म्‍हणाले, ”आम्‍ही महामारीच्‍या या अनपेक्षित काळामध्‍ये देशाची, तसेच भारतीय फार्मा उद्योगक्षेत्राची सेवा करण्‍याची संधी मिळाल्‍याने स्‍वत:ला भाग्‍यवान समजतो. कूल-एक्‍ससोबतची आमची भागीदारी तापमान नियंत्रित फार्मा वेअरहाऊसिंग व वितरणाच्‍या वाढत्‍या गरजांच्‍या पूर्तता करण्‍यासाठी अत्‍याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्‍यामध्‍ये मदत करेल. तापमान नियंत्रित वेअरहाऊसेस लोकांना कोविड-१९ लसींचा पुरवठा करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतील. इंडोस्‍पेसमध्‍ये आम्‍ही आमचे कर्तव्‍य बजावण्‍यास आणि भारतामध्‍ये जागतिक दर्जाच्‍या सुविधा विकसित करण्‍यास सज्‍ज आहोत.”

भारत हा लस व इतर फार्मा उत्‍पादनांचा आघाडीचा उत्‍पादक व वितरक देश आहे. भारताची भूमिका अधिक वाढण्‍याची अपेक्षा आहे. यामध्‍ये तापमान नियंत्रित पुरवठा साखळीला साह्य करण्‍यासाठी संबंधित पायाभूत सुविधेची आवश्‍यकता असेल. या सहयोगाचा भारतातील इंडोस्‍पेसचा व्‍यापक अनुभव आणि जीएलपी सारख्‍या भागीदारांच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या जागतिक कौशल्‍यावर आधारित फार्मा व तापमान नियंत्रित वेअरहाऊसिंग विभागासाठी प्रमाणबद्ध व जागतिक दर्जाच्‍या सुविधा आणण्‍याचा मनसुबा आहे.

इंडोस्‍पेसचा भारतातील नऊ प्रमुख कार्यसंचालन शहरांमध्‍ये विविध विकास टप्‍प्‍यांतर्गत ३८ औद्योगिक व लॉजिस्टिक्‍स पार्क्‍समध्‍ये ४० दशलक्ष चौरस फूटांहून अधिक जागेचा पोर्टफोलिओ आहे.  

Leave a Reply

%d bloggers like this: