अकार्डिअक जुळ्यांचे अतिशय दुर्मीळ उदाहरण, पुण्यात यशस्वी उपचार आणि प्रसूती

पुणे – जगभरातील दुर्मीळ उदाहरणांचे प्रतिनिधीत्व करू शकेल अशा एका उदाहरणात अंजू (नाव बदललेले आहे) या 36 वर्षाच्या स्त्रीवर पुण्यात अकार्डिअक जुळ्यांसाठी यशस्वी उपचार करण्यात आले. त्या व त्यांच्या पतीमधे प्राथमिक वंध्यत्वाची लक्षणे दिसत होती आणि काही छुप्या कारणांमुळे गेल्या 10 वर्षांपासून त्यांना गर्भधारणा होत नव्हती. अंजू यांच्या गर्भाशयामधे सूज (डेनोमायसिस), गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) अतिशय खराब होते, तर त्यांच्या पतीच्या वीर्यामधे निरोगी व पुरेशा स्पर्म्सची संख्या फार कमी हो

या जोडप्याने पुण्यात इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) क्लिनिकमधे संपर्क साधला व अत्याधुनिक प्रजनन पद्धतीचा वापर करून आयव्हीएफची यशस्वी सायकल पूर्ण केली. अंजू यांना पहिल्याच प्रयत्नात जुळ्यांची गर्भधारणा झाली, मात्र त्यांच्या गर्भधारणेमधे एका अतिशय दुर्मीळ अकार्डिअक जुळ्यांचा समावेश होता. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत डॉपलर फीटल अल्ट्रासोनोग्राफीचा वापर करून केल्या जाणाऱ्या देखरेखीमधे अकार्डिअक जुळ्यांची घटना सहजपणे दिसून येते.

ही दुर्मीळ घटना समजावून सांगत इंदिरा आयव्हीएफ पुणे, जिथे ही प्रक्रिया करण्यात आली, तेथील डॉ. अमोल लुंकड म्हणाले, ‘अकार्डिअक जुळ्यांना ‘टीआरएपी सिक्वेन्स’ असेही म्हटले जाते व ही एकत्रित जुळ्यांची अतिशय दुर्मीळ घटना असते. यामधे एकाच जुळ्यातर्फे स्वतःसह दुसऱ्या जुळ्याला रक्तपुरवठा केला जातो. रक्तपुरवठा करणाऱ्या जुळ्याला ‘पम्प ट्विन’ असे म्हटले जाते, तर दुसऱ्या जुळ्याला ‘अकार्डिक ट्विन’ असे म्हटले जाते. अकार्डिअक ट्विनला हृदय नसते व त्याचा मृत्यूदर 100 टक्के असतो. अशा प्रकारच्या गर्भधारणांचे प्रमाण अतिशय दुर्मीळ म्हणजे, 40,000 जन्मांमधे एक याप्रमाणे असते.’

अशा उदाहरणांमधे नॉर्मल बाळाला (पंप ट्विन) वाचवणे हे प्रमुख उद्दिष्ट असते, कारण दोन्ही बाळांची नाळ, आई व बाळादरम्यान घटकांची देवाणघेवाण करणारी पेशी समान असते. वेळीच योग्य उपचार केले गेले नाही, तर नॉर्मल बाळाचा अवयवांच्या अतिरिक्त पंपिंगमुळे हृदय निकामी होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. नॉर्मल बाळाला कोणताही धक्का किंवा इजा पोहोचू न देता अस्वाभाविक अकार्डिअक जुळ्याचा रक्तपुरवठा खंडित करून गर्भारपण पुढे सुरू ठेवणे हे मोठे आव्हान ठरते.

अंजू यांच्यावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांच्या टीममधील डॉ. अमित मगदुम आणि डॉ. रमेश गायकवाड यांनी वैद्यकीय तंत्रज्ञानातील इन्फ्राट्युरिन फीटल थेरपी आणि लेसर कोग्युलेशन अशा आधुनिक तंत्रांमुळे अशाप्रकारच्या गुंतागुंतीच्या उदाहरणांमधे उपचार करणे शक्य झाल्याचे अधोरेखित केले. नॉर्मल बाळाचा जीव वाचवणारी ही प्रक्रिया गर्भाचे वय 14 आठवडे असताना पुण्यातील इंदिरा आयव्हीएफमधे करण्यात आली. दोन दिवस ही प्रक्रिया सरू होती.

इन्फ्राट्युरिन फीटल थेरपीनंतर अशा रूग्णांना खास काळजी घ्यावी लागते, कारण त्यांची वेळेआधी प्रसूती होण्याची शक्यता असते. या उदाहरणामधे अंजू यांच्यावर नियमित देखरेख करण्यात आली, कारण त्यांना मधुमेह होता. त्यांची गर्भधारणा पूर्ण वेळ भरली व आता त्या आणि त्यांचे पती जानेवारीमधेच काही दिवसांपूर्वी एका निरोगी बाळाचे पालक झाले.

योग्य आणि वेळेवर निदान, त्याला योग्य वेळेवर आधुनिक उपचारांची जोड दिल्यामुळे आम्हाला मौल्यवान जीव वाचवणे शक्य झाले. यापूर्वी अशाप्रकारची प्रक्रिया पुण्यात केली गेली नव्हती आणि रुग्णांना उपचारांसाठी मुंबईला जावे लागायचे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या उपलब्धतेमुळे अशाप्रकारच्या दुर्मीळ गर्भधारणेवर उपचार करणे आता शक्य झाले आहे. इन्फ्राट्युरिन फीटल थेरपीविषयी अधिक जागरूकता निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे, कारण अशी जोडपी बहुतेक वेळेस घाबरलेली, साशंक आणि गोंधळलेली असतात. योग्य कौन्सेलिंग फार महत्त्वाचे असते. अशा उदाहरणांमधे यशस्वी उपचार हा मौल्यवान परंतु गुंतागुंतीच्या गर्भधारणांमधे आशेचा किरण ठरू शकतो, असेही डॉ. लुकंड म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: