१२ वी खुली बुद्धीबळ स्पर्धा – कशीश जैन, सौरभ म्हामणे संयुक्त आघाडीवर    

पुणे : कशीश जैन, सौरभ म्हामणे हे  विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या खुल्या  जलद बुद्धिबळ स्पर्धेत १२ ते १८ वयोगटात चौथ्या फेरीअखेर प्रत्येकी ४ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. 
 भांडारकर रस्त्यावरील मिलेनियम टॉवर येथे ही दोन दिवसीय स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी  सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, प्रकाश कुंटे, केतन खैरे, सुनील पांडे, समीर हाळंदे, वरुण जकातदार, दत्तात्रय फंड, गुणेश साने  उपस्थित होते. पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष कै. जोसेफ डिसुझा यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

स्पर्धेतील १२ ते १८ वयोगटात चौथ्या फेरीत पहिल्या पटावर फिडे मास्टर कशीशने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या मिहीर सरवदेला नमविले. यानंतर दुसऱ्या पटावर सौरभने अदिती कायलला पराभूत केले. कशीश  आणि सौरभ प्रत्येकी ४ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीचे काही निकाल :मिहीर सरवदे पराभूत (३) वि. कशीश जैन (४) , सौरभ म्हामणे (४) वि. वि. अदिती कायल (३), शार्दूल गोडबोले (३) पराभूत वि. ओम लामकाने (३.५), अभिजय दंडवते (२) पराभूत वि. केवल निर्गुण ( ३), आर्यन शहा (३) वि. वि. अनया रॉय (२), आर्यन सिंगला (३) वि. वि. राजेश्वरी देशमुख (२), ओजस देवशातवर (२) पराभूत वि. केरा डागरिया (३), प्रथमेश शेरला (३) वि. वि. ओंकार पाटील (२), अनुज दांडेकर (३) वि. वि. धनश्री खैरमोडे (२), हर्षल पाटील ( २.५) बरोबरी वि. वरद वालदे (२.५).

Leave a Reply

%d bloggers like this: