कै. राम गणेश गडकरी यांच्या १०२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पुणे – मराठी साहित्यातील सिध्दहस्त लेखक कै.राम गणेश गडकरी यांच्या १०२ व्या स्मृतिदिनानिमित्त कला क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन संभाजी ऊद्यानाच्या प्रवेशद्वारा जवळ गडकरींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

मराठी साहित्याच्या क्षेत्रात विविध प्रकारचे लेखन करणाऱ्या या लेखकाची स्मृती गेली अनेक वर्ष आम्ही जपत असून हि परंपरा यापुढेही चालू राहील असे संवाद ,पुणेचे सुनील महाजन यांनी सांगितले तर ज्येष्ठ लेखक , अभिनेते श्रीराम रानडे यांनी ‘एकच प्याला ‘ या गडकरींच्या नाटकातील प्रवेशाचा काही भाग सादर केला. कलाकार विजय कुलकर्णी यांनी पुढील वर्षापासून गडकरींच्या नाटकांच्या प्रवेशाची स्पर्धा ही नवीन पिढीतील कलाकारांसाठी आयोजित करावी हि त्यांना खरी आदरांजली ठरेल असे व्यक्त केले.

एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांनी सांगितले की, जर आपण शेक्सपिअर या लेखकाचे कौतुक करीत असू तर आपल्या मातीतील या महान लेखकाचे कौतुक आणि त्यांच्या साहित्याचा प्रसार करणे हे प्रत्येक रंगकर्मीचे आद्य कर्तव्य आहे आणि हिच त्यांची स्मृती जतन करण्याचा ऊत्तम मार्ग आहे.
याप्रसंगी किशोर सरपोतदार, अजित कुमठेकर, कौशिक कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम रानडे, कलाकार विजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: