fbpx
Monday, June 17, 2024
Sports

एटेनएक्स स्पोर्ट्स यांच्या वतीने पुणे ते महाबळेश्वर रिलेचे आयोजन

पुणे, दि. २३ – कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी मानसिक कणखरता ही महत्त्वाची असते. आपली मानसिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून एटेनएक्स स्पोर्ट्स यांच्या वतीने पुणे ते महाबळेश्वर रिलेचे आयोजन २६ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आले असल्याची माहिती एटेनएक्स स्पोर्ट्सचे संस्थापक संचालक आदित्य गणेशवाडे यांनी दिली.

या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एटेनएक्स स्पोर्ट्सचे करण अंतुरकर, ट्रायअथलीट वर्धन बोरगावे, साकेत गणेशवाडे, तेज खाडिलकर, शंकर राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

उपक्रमाविषयी बोलताना ट्रायअथलीट वर्धन बोरगावे म्हणाले, पहाटे ४ वाजता वारजे भागातून या रिलेला सुरुवात होणार आहे. गणतंत्रदिनाच्या निमित्ताने झेंड्याला सलामी देवून आम्ही रिलेला सुरुवात करणार आहोत. यात माझ्यासह साकेत गणेशवाडे, आदित्य गणेशवाडे, तेज खाडिलकर, करण अंतुरकर, राज जोशी, डॉ.चिन्मय चोपडे, शंकर राऊत, प्रतिक आकडकर हे धावपटू पुणे ते महाबळेश्वर हे सुमारे १२६ किमी अंतर धावणार आहेत.

करण अंतुरकर म्हानले की, कोणताही मैदानी खेळ आपल्या क्षमता वाढविण्यासाठी मदत करतो. मैदानी खेळांमुळे शारीरिक आणि मानसिक कणखरता निर्माण होते. याचा फायदा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने किमान एका मैदानी खेळात सहभागी होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading