Thursday, June 18, 2026
PUNE

अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी  21 लाख रुपयांचा धनादेश

पुणे, दि. 21 – अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी च्या निधी संकलना करिता परमपूज्य ऋतंभरा देवीजी यांचा पुण्यात मुक्काम होता. यावेळी द्वारकादास श्याम कुमार  या कापड व्यवसायाचे संस्थापक  द्वारकादास जी यांचे घरी पूजनीय ऋतंभरा देवीजींचे आगमन झाले याप्रसंगी 21 लाख रुपयांचा धनादेश माननीय द्वारकादासजी आणि त्यांचे चिरंजीव व व मॅजेस्टिक डेव्हलपर्सचे मनीष माहेश्वरी यांनी साध्वी ऋतंबराजी यांच्या हाती सुपूर्त केला.

राष्ट्र उभारणीसाठी राम मंदिराची निर्मिती आणि सर्वसामान्य व्यक्तींकडून त्यासाठी निधी उभारणी या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशभर निधी संकलनाचे कार्य अत्यंत वेगात सुरू आहे. पुण्यात या संकलनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मॅजेस्टिक डेव्हलपर्स चे मनीष माहेश्वरी यांनी उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करून आपले पिताजी माननीय द्वारकादास जी यांचे हस्ते आपल्या सर्व व्यवसायांचा एकत्रित निधी ऋतंबराजी यांचे स्वाधीन केला. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे महेश पोहनकर , हेमंत हरहरे आणि विनीत कुबेर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading