शहरी भागात लोक सहभागातून वनांचा विकास होणे गरजेचे – खासदार ॲड. वंदना चव्हाण
पुणे, दि.१७ –खासदार वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या युथ कनेक्ट या उपक्रमअंतर्गत आज तुकाई टेकडी वरील जैवविविधता उद्यान ,बाणेर येथे भेट दिली. युथ कनेक्ट च्या तरुणांना वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून चालू आसलेल्या वृक्ष लागवड व संगोपन यांची माहिती व्हावी या उद्देशाने ही भेट आयोजित केली होती.
या वेळी खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, जागतिक तापमान वाढीचे संकट लक्षात घेवून शहरी भागात ऑक्सिजन पार्क ची निर्मिती झाली पाहिजे. तसेच वसुंधरा अभियाना अंतर्गत केलेल्या कामाचे कौतुक केले. या भेटीच्या वेळी त्यांचे समवेत बी.वी.जी. ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड ही उपस्थित होते व त्याच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले
वसुंधरा अभियानाचे पांडुरंग भुजबळ, आप्पासाहेब पोकळे व संजय मुरकुटे व त्यांचे सहकारी यांनी उपस्थित तरुणांना विविध वृक्षाची व टेकडीवर चालू आसलेल्या पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली.या वेळी खासदार वंदना चव्हाण व हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते वसुंधरा अभियानच्या सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी बाबुराव चांदोरे, सुषमा निम्हण, डॉ. सुनिल जगताप , नितीन कळमकर तसेच युथ कनेक्टचे सुशांत ढमढेरे, महेश हांडे, राकेश कामठे, विनायक हनमघर, गणेश नलावडे, आनंद सवाणे, समिर पवार, स्वप्निल दुधाने, श्वेता होनराव कामठे, मनोज पाचपुते, अश्विनी परेरा, गणेश मोहीते, सोनाली गाडे, ऋुषिकश भुजबळ, ऋुषीकेश परदेशी, सनी मानकर ,अबोली सुपेकर, प्रियांक शहा, प्रशांत कदम, संदिप बालवडकर, रेणुका चलवादी, डॉ. पल्लवी प्रसाद,, ययाती चरवड, श्वेता कामठे होनराव, सचिन बेनकर, स्विकार देशपांडे, शिवम इभाड, विकी वाघे, विक्रम जाधव, विपुल मैसूरकर, अमर रजपुत, विशाल मोरे उपस्थित होते. या प्रसंगी स्वागत सुषमा सातपुते यांनी केले तर आभार युथ कनेक्ट चे अध्यक्ष राहुल पोटे यांनी मानले.
