Sunday, May 31, 2026
MAHARASHTRAPUNE

न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीला होणाऱ्या दिरंगाई विरोधात वन कामगार संघटनेचा उपोषणाचा इशारा

पुणे, दी. १५ – न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीला दप्तर दिरंगाईमुळे विलंब होत असल्याने वनकामगार संघटनेने उपोषणाचा इशारा दिला आहे. १८ जानेवारीपासून वयोवृद्ध, निवृत्त वनमजून वनविभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसणार असल्याची माहिती वन कामगार संघटनेचे सचिव प्रकाश शिंदे व कार्याध्यक्ष अनंत घरत यांनी दिली.

वन कामगारांनी वेळोवेळी केलेल्याविविध मागण्या व काही प्रकरणात न्यायालयाचे आदेश प्राप्त होऊन २० वर्ष होऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने वन कामगारांना न्याय मिळावा म्हणून धरणे आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. मंत्रालयात पाठपुराव करण्याची सर्व प्रशासकिय जबाबदारी वन अधिका-यांची असूनही कोणत्याही प्रकारे वन अधिकारी पाठपुरवठा करीत नाही. त्यामुळे न्यायालयीन निर्णय होऊनही वयोवृद्ध,निवृत्त वनमजूर न्यायापासून वंचित आहेत. वर्नानुवर्ष हेलपाटे मारुनही काही निर्णय होत नसल्याने अनेक वनमजुरांचे निवृत्ती वेतन व इतर अनेक प्रश्न, मागण्या प्रलंबित राहिल्या आहेत. यामुळे नाईलाजास्तव वन विभागाच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती वनकामगार संघटनेचे सचिव प्रकाश शिंदे व कार्याध्यक्ष अनंत घरत यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading