fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRATOP NEWS

पाचवी ते आठवी चे वर्ग सुरू होणार – वर्षा गायकवाड

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत (School) महत्वाची बातमी. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, मुंबई एमएमआरडी विभागातील शाळा या बंद राहणार आहेत. या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांना केली.

करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरु करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. अंतिम निर्णय मात्र स्थानिक प्रशासनावरच सोडण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते, असा विश्वास त्यांनी पालकांना दिला आहे.

दरम्यान, स्थानिक परिस्थितीनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. अर्थात यासाठी पालकांची संमती, शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आदी सर्व यापूर्वीचे नियम यापुढेही लागू राहणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मुंबईतील शाळा मात्र पुढील आदेश मिळेपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद होत्या. त्या पुढील सूचना मिळेपर्यंत बंदच राहतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading