मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन; 21 जानेवारीला पुण्यातून होणार सुरुवात

पुणे – मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण, अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करावे, यासह इतर
मागण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा संकल्प दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्याची सुरुवात 21 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा येथून होणार असल्याचे जाहीर केले.

या पत्रकार परिषदेस महिला आघाडी प्रमुख पुष्पलता सकटे, उपाध्यक्ष लक्ष्मी पवार ,शहरादयक्ष जयंत जाधव ,विकास भोंडवे ,खंडू पवार उपस्थित होते.

प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे म्हणाले की ,अलीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षण ,ओबीसी आरक्षण ,धनगर आरक्षण याबाबत आघाडी सरकार विशेष भूमिका घेताना दिसत आहे. परंतु मातंग समाजाच्या आरक्षणाकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप सकटे यांनी केला आहे .त्यामुळे हे सरकार मातंग समाजाच्या बाबतीत विरोधी भूमिका घेत आहे त्यामुळेच याचा निषेध करण्यासाठी येत्या 21 जानेवारीपासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून त्याची सुरवात पुण्यातून करणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले .
या आंदोलनात मातंग समाजाच्या आरक्षणासह बार्टी च्या धर्तीवर मातंग समाजासाठी आर्टी चि स्थापना करावी , सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे , अण्णाभाऊ साठे महामंडळ त्वरित सुरू करावे ,दलित महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने ठोस कृती कार्यक्रम राबवावा.या प्रमुख मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे .

Leave a Reply

%d bloggers like this: