विराट – अनुष्काला कन्यारत्न, विरुष्कावर अभिनंदनाचा वर्षाव
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना आज दुपारी कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. विराटने आज ट्विटरवरून ही माहिती दिली. ” आयुष्यातील नवीन पर्वाला सुरूवात झाली आहे. आज दुपारी आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. आम्ही सर्व चाहत्यांचे आभारी असून असेच प्रेम आमच्यावर असूदेत”, अशा शब्दांत विराटने चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेयर केली आहे.
करोनाच्या काळातच विराटने अनुष्का गोड बातमी देणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून या नवीन पाहुण्यांची त्यांच्या चाहत्यांना प्रतीक्षा होती. दरम्यान अनुष्काने केलेले मॅटरनिटी शूट ही खूप व्हायरल झाले होते.
