fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा-२०२१’ चा निकाल जाहीर 

पुणे : भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२१’ चे आयोजन  दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी आयएमईडी, एरंडवणे, पौड रोड, पुणे येथे करण्यात आले होते . या स्पर्धेत भाविका शर्मा(पुणे ) ,बिशना चंद्रन (केरळ ) यांचा संयुक्तपणे प्रथम क्रमांक  आला आहे.  क्षितिजा पवार (कडेगाव ),अपूर्वा सिंग (पुणे ) यांचा द्वितीय तर संकेत पाटील (कोल्हापूर ) गायत्री गायधनी (पुणे) यांचा तृतीय  क्रमांक आला आहे.श्रेया वर्मा (आग्रा ) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले .   

भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्पर्धेचे उदघाटन केले . 

या स्पर्धेचे आठवें वर्ष होते . देश भरातून १३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी  मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन गटात ही स्पर्धा झाली. प्रथम क्रमांकास रुपये दहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये आठ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास सहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप होते 

‘गतीमान शिक्षणातून समाज परिवर्तन :डॉ. पतंगराव कदम’,  ‘कोवीड १९ नंतरची जागतिक परिस्थिती’, ‘ राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० ‘, ‘ एकविसाव्या शतकातील सांस्कृतिक परिवर्तन’, ‘डिजिटायझेशनच्या युगाचे फायदे तोटे’,  ‘ माझ्या दृष्टीकोणातून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ‘, ‘ तरुण आणि उद्योजकता ‘, ‘ भारतीय संविधान : लोकशाहीच्या यशाचे गुपीत ‘हे स्पर्धेचे विषय होते .

डॉ. जयंत ओक, डॉ. भारतभूषण सांख्ये, विवेक रणखांबे, डॉ. शरद जोशी  यांनी परीक्षण केले .

 डॉ हेमचंद्र पाडळीकर, डॉ प्रमोद पवार, डॉ सचिन आयरेकर, डॉ विजय फाळके,  सुजाता मलिक, प्रतिमा गुंड यांनी संयोजन केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading