अनेक वर्षापासून बंद असलेला मॉडर्न चौकातील जी. एम. भोसले भुयारी मार्ग अखेर खुला
पुणे, दि. २८ – मागील अनेक वर्षापासून बंद असलेला जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न चौक येथील जी. एम. भोसले भुयारी मार्ग प्रा. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांच्या पाठपुराव्यानंतर व पत्रव्यवहारानंतर पाहणी करून सोमवारी नागरिकांसाठी खुला करण्यात आला. हा भुयारी मार्ग बंद असल्यामुळे अंत्यत वर्दळीचा व रहदारीचा जंगली महाराज रस्ता ओलांडण्यासाठी जेष्ठ नागरिक , महिला , विद्यार्थी यांना कसरत करावी लागत होती.
भुयारी मार्ग सुरु झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे या परिसरातील अपघातांचे प्रमाण कमी होईल. या पाहणी दरम्यान प्रभागातील आमदार व स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे , निलिमा खाडे , स्वाती लोखंडे , शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहा- आयुक्त ल आशा राऊत , उप अभियंता सुनील बोंगाळे , कनिष्ठ अभियंता शितल कडू , सागर सपकाळ , आरोग्य विभागाचे प्रमुख आरोग्य निरीक्षक इनामुद्दीन इनामदार , आरोग्य निरीक्षक शिवाजी गायकवाड व भाजपा युवती आघाडी प्रमुख प्रा.डॉ. निवेदिता एकबोटे उपस्थित होते. जी. एम. भोसले भुयारी मार्ग खुला केल्याबद्दल स्थानिक रहिवाश्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार मानले. प्रभागातील वाहतूक व्यवस्था ही अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविण्याचा माझा मानस आहे त्यासाठी मी महानगरपालिका अधिकारी व वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी यांच्यासमवेत स्थानिक नागरिकांसोबत बैठक आयोजित करणार आहे असे प्रा. सौ. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांनी मनोगत व्यक्त केले.
