पुणे – मुंढवा पोलिस चौकीनजीक फर्निचर गोडाऊन,मारुती सुझूकी सेंटरमधे भीषण आग, पहा Video
पुणे, दि. 20 – पुण्यात मुंढवा स्मशानभूमी परिसरात फर्निचर गोडाऊनला आग लागली. या आगीची झळ शेजारच्या मारूती सुझुकी सेंटरलाही बसली. पहाटे २ च्या सुमाराला हा आगीचा भडका उडाला.
आगीचं कारण समजू शकलेलं नाही, पण आगीत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. तेथील वातावरण कुलिंग करण्याच काम केलं जात आहे.
या अगोदर पुण्याच्या चांदनी चौक परिसरात काही दिवसांपूर्वी संध्याकाळी अचानक एका ट्रकमध्ये भीषण आग लागली. आग लागल्यानंतर ट्रक चालकाने ट्रकमधून उडी मारत स्वतःचे प्राण वाचवले. स्थानिक लोकांनुसार, आग लागल्या नंतरही ट्रक काही काळ रस्त्यांनी धावत होता.
शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता झालेल्या या घटनेनंतर वारजे ब्रिजवर जवळपास १ तास ट्रॅफिक जाम होते. यादरम्यान बँगळुरू-पुणे हायवेवर गाड्यांची लांब रांग पाहायला मिळाली.
