Sunday, May 31, 2026
PUNE

सावित्राईबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिले तीन विद्यार्थी ‘सूर्यदत्ता’चे

पुणे : सावित्राईबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बीएस्सी एचएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेत सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या (एससीएचएमटीटी) विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या दहामध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व सहावा क्रमांक पटकावत सूर्यदत्ताच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. मोहित पाटील (८९.८८%) याने प्रथम, मुद्रा आढाव (८९.३८%) हिने द्वितीय, वेदांगी पंडित (८९.०५%) हिने तृतीय, प्रियांका वाळुंज (८८.१७%) हिने चतुर्थ, तर पंकज पाटील (८६%) याने सहावा क्रमांक पटकावला आहे. विद्यापीठाअंतर्गत पुणे, नाशिक आणि अहमदनगर येथील १५ महाविद्यालयातून १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये गुणवत्ता यादीतील पहिल्या १० मध्ये सूर्यदत्ताचे पाच विद्यार्थी आले आहेत. या विद्यार्थ्यांची हॉटेल ओबेरॉय व हॉटेल हयातमध्ये निवड झालेली आहे.


विद्यापीठाच्या एप्रिल-मे २०२० मध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विशेष श्रेणीसह प्रथम श्रेणी मिळाली. गेली सलग तीन वर्षे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त करीत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.


संस्थेच्या सचिव व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया म्हणाल्या, “ऑक्स्फर्ड ऑफ ईस्ट अशी ओळख असलेल्या पुण्यात सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत १९९९ मध्ये सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट स्थापन झाली. सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन (एसईएफ) महाराष्ट्र शासनाअंतर्गत नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून गेली दोन दशके सूर्यदत्ता एकनिष्ठपणे काम करत आहे. देशातील विविध शासकीय आणि खासगी विद्यापीठांशी व संस्थांशी सूर्यदत्ता संलग्नित आहे. ‘नॅक’सह अन्य अनेक संस्थांनी सूर्यदत्ताचा गौरव केलेला आहे. एआयसीटीई-सीआयआय उद्योग तांत्रिक संस्थांशी जोडलेल्या क्रमवारीत संस्थेने सलग ५ वर्षे रौप्य श्रेणीत स्थान मिळवले आहे. टाइम्स बी-स्कूल्स नेशनल रैंकिंगमध्ये सूर्यदत्ताला ४० वे स्थान मिळाले आहे. एआईसीटीई-सीआयआयने २०१९ मध्ये तंत्रज्ञान संस्थांच्या मानांकन यादीत सूर्यदत्ता प्लैटिनम प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले होते.”


“सावित्राईबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित, ‘नॅक’ अधिस्वीकृतीधारक आणि तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त ‘एससीएचएमटीटी’ची स्थापना २००४ मध्ये झाली. एससीएचएमटीटी’तर्फे बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम चालवला जातो. हॉस्पिटॅलिटी क्षेतत्रातील व्यावसायिक आणि उद्योजक घडविण्यावर येथे भर दिला जातो.अभ्यासक्रमातील शिक्षणासोबतच ‘एससीएचएमटीटी’च्या वतीने औद्योगिक कंपन्यांना भेटी, तज्ज्ञांचे सेमिनार्स, संकल्पनेवर आधारित भोजन, फूड फेस्टिवल आयोजिले जातात. या क्षेत्राचे सखोल आणि प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना घेता यावे, यासाठी विविध उपक्रम राबवून त्यात विद्यार्थ्यांना सहभागी करण्यास प्रोत्साहित केले जाते. जागतिक स्तरावरील स्वरूपाचे विद्यार्थ्यांना आकलन व्हावे, यासाठी नामांकित वैश्विक संस्थांशी ‘एससीएचएमटीटी’ने सामंजस्य करार केले आहेत. त्यामध्ये स्विस्सम रशिया, लिंकन विद्यापीठ मलेशिया, लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग (एलएपिटी), अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशन इन्स्टिट्यूट (एएचएलईआय) आदी संस्थांचा समावेश आहे. ‘जीएचआरडीसी’ने केलेल्या सर्वेक्षणात ‘एससीएचएमटीटी’चा समावेश टॉप हॉटेल मॅनेजमेंट इन्सिट्यूट्स ऑफ एक्सलन्स इन इंडियामध्ये पाचव्या स्थानावर, तर महाराष्ट्रातील प्रायव्हेट हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रवर्गात तिसऱ्या स्थानावर समावेश झाला होता,” असेही चोरडिया यांनी नमूद केले.


प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकवृंद, उत्तम पायाभूत सुविधा ‘एससीएचएमटीटी’मध्ये आहेत. ‘एससीएचएमटीटी’ने आजवर विक्रमी प्लेसमेंट्स केल्या आहेत. देशात आणि विदेशात ‘एससीएचएमटीटी’चे विद्यार्थी यशस्वीपणे आपले करिअर घडवत आहेत. सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस, अमेरिका, न्यूझीलंड यासह इतर अनेक देशांत सूर्यदत्ताचे विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. मॉरिशसमधील शांग्रीला हॉटेल, जर्मनीतील रिटलबर्ग हॉटेल, मलेशियातील हिल्टन, चीनमधील इंडियन किचन स्पाईसेस लिमिटेड, सिंगापूरमधील द रिजंट, अमेरिकेतील हॉलिडे इन, फ्लोरिडामधील रिनाइसन्स, पटायातील सन सिटी, सिंगापूरमधील मेरियट यांसारख्या पंचतारांकित हॉटेलात सूर्यदत्ताचे विद्यार्थी वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. तसेच अनेकांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.”


जॉब फेअरचे यशस्वी आयोजनसूर्यदत्ता एज्यु-सोशियो इंडस्ट्री कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत विविध औद्योगिक संस्था, सामाजिक व्यासपीठ आणि महाविद्यालयाना जोडून घेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न असतो. महाराष्ट्राच्या विविध भागातून आपण करीत असलेल्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन वर्षात सूर्यदत्ताने सर्वांसाठी जॉब फेअरचे आयोजन केले होते. त्यात ६५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नामांकित अशा २० कंपन्यांमधुन लाभ झाला. अनेकांना त्यातून नोकऱ्या मिळाल्या. जेडब्ल्यू मॅरियट, आयबीआयएस, ताज विवांता, हयात, कार्निव्हल क्रूज लाईन्स, पी अँड ओ क्रूझ लाईन्स यांसारख्या नामवंत कंपन्यांनी या जॉब फेअरमध्ये भाग घेतला होता. प्लेसमेंटसोबतच ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल, त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित एमबीए इन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, तर एआयसीटीई मान्यताप्राप्त पीजीडीएम हा अभ्यासक्रम करण्याची संधी सूर्यदत्तामध्ये उपलब्ध आहे.


गरजूना शिष्यवृत्ती जाहीरसध्याच्या कोविडमुळे समाजातील अनेक घटकांवर परिणाम झाला आहे. टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, उत्पादन, बांधकाम, रियल इस्टेट, आदी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे अनेकांची मुले आपले उच्च शिक्षण थांबविण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या विचारात असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा विद्यार्थ्यांना सामाजिक भावनेतून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम सूर्यदत्ता करीत आहे. सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिटीव्ह अंतर्गत विविध प्रकारच्या शिष्यवृत्यांची घोषणा केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती www.suryadatta.org वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मोफत करिअर मार्गदर्शनासाठी ९८८१४९००३६ किंवा ९११२२९७६०६ यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading