राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदी डॉ. पवन सोनवणे तर जिल्हा सरचिटणीस पदी डॉ. अजिंक्य तापकीर यांची नियुक्ती
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदी डॉक्टर पवन सोनवणे तर जिल्हा सरचिटणीस पदी डॉक्टर अजिंक्य तापकीर यांची नुकतीच निवड करण्यात आली. राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे
प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. ते निमा संघटनेच्या माध्यमातून राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर डॉक्टरांच्या संघटनाचे काम गेली अनेक वर्षांपासून करत आहेत. शिक्रापूर येथील माऊलीनाथ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे ते संचालक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आमदार अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या माध्यमातून पुणे शहर जिल्ह्यासह राज्यभरातील डॉक्टरांचे संघटन वाढवून त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम करणार असल्याचे यावेळी डॉ. पवन सोनवणे यांनी सांगितले.
