Saturday, May 30, 2026
NATIONALTOP NEWS

देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? कमल हसन यांचा सवाल

नवी दिल्ली – नव्या संसद भवनासाठी नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. या नव्या संसदेसाठी तब्बल १ हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यामुळे नव्या संसद भवनाची गरज काय असा प्रश्न जनसामान्यांत पडला आहे. म्हणून प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

कमल हसन म्हणाले की, “अर्धा देश उपाशी झोपतो आहे. अशा परिस्थितीत एक हजार कोटींच्या संसद भवनाची गरज काय? कोरोना व्हायरसमुळे लोकांनी आपलं काम गमावलं आहे. चीनची भिंत बांधत असताना हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या देशातील नेत्यांनी सांगितलं की ही भिंत तुमच्या संरक्षणासाठी आहे. आता माझा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे की तुम्ही कुणाच्या संरक्षणासाठी नवं संसद भवन बांधत आहात? आदरणीय पंतप्रधानांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं”

तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हासन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी नव्या संसदेच्या मुद्द्यावरुन कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading