Saturday, May 30, 2026
PUNE

‘किल्ले राजगड उत्सवाला’ लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याने पुण्यातून प्रारंभ

पुणे : फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती… ज्येष्ठ महिलांनी मूर्तीचे केलेले पूजन व औक्षण… आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवरायांच्या नावाचा अखंड जयघोष अशा शिवमय झालेल्या वातावरणात ३५४ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिन सोहळ्याला पुण्यातून प्रारंभ झाला. किल्ले राजगड उत्सवांतर्गत साज-या होणा-या या स्मृतीदिनाला लाक्षणिक पालखी सोहळ्याने उत्साहात सुरुवात झाली. 
पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३५४ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ह्यकिल्ले राजगड उत्सवाह्णचे आयोजन राजगड येथे करण्यात आले आहे. त्या सोहळ््याचा लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळा पुण्यातील सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळ येथे संपन्न झाला. यावेळी माजी खासदार व भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अभय माटे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव प्रसादे, डॉ. सचिन जोशी, सूर्यकांत भोसले, अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, योगेंद्र भालेराव, रश्मी अनिल मते उपस्थित होते. उत्सवाचे यंदा ४० वे वर्ष आहे. 
प्रदीप रावत म्हणाले, शिवचरित्र ही एक साहस कथा आहे, असे समजून त्याकडे आपण पाहिले, तर आपल्याला शिवरायांचे खरे चरित्र समजले नाही. आम्ही एक आहोत, ही भावना निर्माण करणारे शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष होते. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून शिवरायांनी आताच्या पिढीकरीता राष्ट्रनिर्माणाची आधुनिक तीर्थक्षेत्र निर्माण केली आहेत. आजच्या काळातील आव्हानांवर मात करण्याकरीता शिवचरित्र हे सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल. 
अभय माटे म्हणाले, आग्य्राहून सुटका ही केवळ शिवाजी महाराजांची सुटका नव्हती, तर ती हिंदवी स्वराज्याची सुटका होती. औरंगजेबाला हुलकावणी देत आग्य्राहून वाºयाच्या वेगाप्रमाणे आपली सुटका करणाºया छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या जीवनातील ही अतिशय महत्वाची घटना होती, असेही त्यांनी सांगितले. वसंतराव प्रसादे म्हणाले, हा उत्सव साजरा करीत असताना अनेक अडचणी आल्या परंतु अडचणींना तोंड देत हा उत्सव संस्थेच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव एका पिढीकडून दुसºया पिढी पर्यंत पोहचावा तसेच तरुणांना इतिहासातील घटनांचे महत्व कळावे म्हणून उत्सवात तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. 
राजगडावर शनिवार, दि. १९ डिसेंबर रोजी खंडोबाच्या माळावरती पाली गाव राजगड पायथा येथे दुपारी ४ वाजता गड जागरण कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ढोल-ताशा स्थिरवादन आणि यानंतर व्याख्यान व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रविवार, दि. २० डिसेंबर रोजी किल्ले राजगड येथे वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सुर्यकांत भोसले यांच्या हस्ते सुर्योदयाच्यावेळी ध्वजारोहण होणार आहे. यानंतर सकाळी ८ वाजता पाली दरवाजा ते महाराजांचे सदर ते पद्ममावती मंदिरपर्यंत पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading