ऑरा तर्फे नवीन अॅस्ट्रा कलेक्शन सादर
पुणे, दि. ९ – ऑरा या भारताच्या डायमंड ज्वेलरीतील अग्रगण्य ब्रँडने नवे डिझाईन्स बाजारात सादर केले आहेत. या नव्या डिझाईन्सच्या हिरेजडित दागिन्यांच्या खरेदीसाठी खास ईएमआयची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अॅस्ट्रा कलेक्शनद्वारे ऑरा ने नवे डिझाईन्स लाँच केले आहेत. त्यामध्ये अत्यंत आकर्षक मात्र परवडतील अशा डायमंड नेकलेस आणि इयरिंग्सचा समावेश आहे. हिऱ्यांविषयी आकर्षण, प्रेम आणि जिव्हाळा असलेल्या ग्राहकांसाठी हे नवे डिझाईन्स सादर करण्यात आले आहेत. हे दागिने खरेदी करण्यासाठी केवळ ९९९९ रुपयांचे डाऊनपेमेंट करून उवर्रित रक्कम नऊ मासिक हफ्त्यांमध्ये आणि ते सुद्धा शून्य व्याजदराने भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑरा तर्फे सादर करण्यात आलेल्या नेत्रदीपक अशा अॅस्ट्रा कलेक्शनमध्ये रात्रीच्या चांदण्यांचे सौंदर्य टिपण्यात आले आहे. सध्याच्या काळातील ग्राहकांना पसंत पडतील अशा डिझाईन या नव्या कलेक्शनमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. विशेषतः चार नव्या डिझानचे डायमंड नेकलेस आणि ईयरिंग हे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या डायमंड नेकलेसची किंमत ९९,९९९ रुपये असून त्यासाठी मॅचिंग ठरतील असे इयरिंगसुद्धा रास्त दरामध्ये उपलब्ध आहेत.
या नव्या डिझाईनच्या लाँचप्रसंगी ऑराचे व्यवस्थापकीय संचालक दीपू मेहता म्हणाले, आपल्या बजेटमध्ये कोठेही तडजोड न करता डायमंड ज्वेलरी परिधान करण्याची आणि त्याद्वारे आपले सौदर्य खुलविण्याची इच्छा प्रत्येक भारतीय स्त्रीला असते. आर्थिक तडजोड न करता, सुलभ मासिक हफ्त्यांवर सर्वोत्तम डायमंड ज्वेलरी खरेदी करण्याची संधी देशात पहिल्यांदाच आमच्या ईएमआय स्कीमच्या माध्यमातून देण्यात आली आहे. स्वतःसाठी किंवा आपल्या प्रियजनांसाठी डायमंडचे दागिने खरेदी करण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी या निमित्ताने सर्वांना मिळत आहे. नव्या पिढीच्या महिलांंमध्ये डायमंड ज्वेलरीविषयी आकर्षण आहे आणि त्यांच्यासाठी ऑरा तर्फे सादर करण्यात आलेले अॅस्ट्रा कलेक्शन हे सर्वोत्तम आहे.
देशभरामध्ये असलेल्या आॅराच्या ४२ रिटेल स्टोअर्समध्ये या सर्व नवे डिझाईन्स आणि आॅफर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, आॅनलाईन https://www.orra.co.in खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
