फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने विना-टाका पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया मोहीम
पुणे, दि. ९ – जागतिक पुरुष नसबंदी दिनाच्या निमित्ताने फॅमिली प्लांनिंग असोसिएशन ऑफ इंडिया पुणे येथेविना-टाका पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया मोहीम राबवली जात आहे. ज्यांचे कुटुंब पूर्णझाले आहे अशा सर्व विवाहित पुरुषांना व जोडप्यांना फॅमिली प्लांनिंग असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने विना-छेद,विना-टाका पुरुष कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष एड.अवलोकिता माने यांनी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.
कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढावा या एकमेव उद्देशाने भारत शासनव फॅमिली प्लांनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सातत्याने कार्यरत आहे.इतकेच नव्हे तर पुरुष नसबंदी करून घेणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी दिली जाणारी रक्कम रुपये३००० हा केवळफॅमिली प्लांनिंग असोसिएशन ऑफ इंडिया च्या पुणे शाखेचा उपक्रम आहे.त्यामुळे या सर्व तऱ्हेने हितकारी सेवेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांनी घेण्याचे आवाहन असोसिएशन करत आहे.अधिकमाहितीसाठी फॅमिली प्लांनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, १०१,वेस्टर्नकोर्ट, गणेशखिंड रोड,ई-स्क्वेअर सिनेमागृहाच्या समोर, शिवाजीनगरअथवा ०२०-२५६७७७३५/३६ या दूरध्वनीक्रमांकावर संपर्क साधावा.
या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्येइस्पितळात भरती होण्याची गरज नाही. नसबंदी शस्त्रक्रिया अतिशय सोपी, साधी ववेदनारहित असून यामध्ये जागेवरती भूल देऊन केवळ शुक्राणू वाहून नेणारी नलिका छेदलीजाते आणि नंतर नलिकेची दोन्ही टोके पुन्हा बांधण्यात येतात. परिणामी शुक्राणूबीजांडापर्यंत पोहचू शकत नाहीत व गर्भधारणा संभवत नाही. पुरुष नसबंदीपश्चात,संभोगाच्यावेळेस पुरुषाचे वीर्यस्खलन पूर्वीसारखेच राहते परंतु त्यात शुक्राणू नसतात. पुरुषनसबंदी शस्त्रक्रियेमुळे संभोगक्षमता किंवा लैंगिक आरोग्यावरती कोणताही परिणाम होतनसून, वैवाहिक जीवनाचा,नकोअसलेल्या गर्भधारणेच्या धोक्याविरहित, पूर्वीइतकाचकिंबहुना अधिक आनंद घेतायेऊ शकतो. ही शस्त्रक्रिया १० मिनटांमध्ये पार पडून,व्यक्तीअर्ध्या तासामध्ये पुन्हा कामावरती रुजू होऊ शकते; परंतुजखम लवकर भरून येण्यासाठी ताण पडणारे, श्रमाचेकाम आणि संभोग मात्र आठवडाभर टाळण्याची आवश्यकता असते. शस्त्रक्रियेच्या तीनमहिन्यानंतर वीर्याची तपासणी करून त्यात शुक्राणू नसल्याची खात्री करून घ्यावी लागते .
फॅमिली प्लँनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, पुणेशाखा येथे हि शस्त्रक्रिया मोफत केली जात आहे. पुरुष नसबंदी करून घेणाऱ्यास, रोजगारभत्ता म्हणून रुपये ११०० सरकारीअनुदान व फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफइंडिया तर्फे सदर कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी रुपये ३००० रक्कम बँकखात्यामध्ये जमा केली जाते. पुरुष नसबंदीसाठी लाभार्थी घेऊन येणाऱ्या दूत व्यक्तीससंस्थेतर्फे रुपये ३५० तर रुपये २०० सरकारी अनुदान मिळते.
