अॅमवे इंडियाला यावर्षी पारंपारिक औषधी वनस्पती पोषण क्षेत्रामधून 100 कोटींच्या व्यवसायाची अपेक्षा
नवी दिल्ली, दि. 9 – उपभोक्ते स्वास्थ्यपूर्ण जीवनाकडे वळत असल्याने वनस्पतींतून पोषणाची मागणी जशी तीव्रतेने वाढ नोंदवीत आहे, अॅमवे इंडिया, देशातील एफएमसीजी थेट विक्री क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी, तिच्या पारंपारिक वनस्पती – पोषण विभागाची विक्री या वर्षी रु. 100 कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज बांधीत आहे. वनस्पती उत्पादनाची वाढती मागणी सामावून घेण्यासाठी, अॅमवे आपला वनस्पति-अर्कांचा स्थानिक पुरवठा बळकट करण्यासाठी सज्ज होत आहे.
सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी आपली बांधिलकी बळकट करताना, अॅमवेने आपली उच्च प्रतीची पोषण उत्पादने बनविण्यासाठीचे साहित्य स्थानिक संसाधनातूनच मिळविणे कायम ठेवले आहे. पोषण क्षेत्रातील एक अग्रज, अॅमवे आपल्या न्यूट्रिलाइट या पोषण क्षेत्रातील ब्रॅण्डसाठी जगात नावाजलेली आहे. भारतातही न्यूट्रिलाइट ब्रॅण्ड लक्षणीय समभाग बाळगून आहे. एकूणच पोषण व निरोगी राहण्याला प्राधान्य देण्याच्या सध्याचा ट्रेंड पाहता, कंपनी पोषण क्षेत्राची वाढ जोराने होण्याचा व त्याचे 2024 पर्यंतचे योगदान 50% हून 65% पर्यंत जाण्याचा अंदाज बांधीत आहे, ज्यात वनस्पति-पोषण विभागाचे लक्षणीय योगदान सम्मिलित आहे.
अॅमवेची न्यूट्रिलाइट पारंपारिक वनस्पति उत्पादनांची मालिका ही वनस्पतींची विश्वसनीय शुद्धता, सुरक्षा व परिणामकारकतेची पातळी देवू करतात कारण ते एका कडक बीज ते पदार्थ प्रक्रियेतून जातात जी उत्पादनांची जागतिक श्रेणीची गुणवत्ता निश्चित करते. या उत्पादनांत वापरल्या जाणाऱ्या वनस्पति या डीएनए फिंगरप्रिंटेड असतात ज्याने वनस्पतींची कार्यक्षम भागासह कोणत्याही प्रकारच्या भेसळीपासून मुक्त उचित प्रजाति आणि गुणवत्ता निश्चित होते. या उत्पादनांच्या परिणामकारकतेची खात्री देण्यासाठी, हे वनस्पतिजन्य पूरक पदार्थ प्रमाणित विना-जीएमओ स्त्रोतांपासून तयार केले जातात. ज्यामुळे ते कोणत्याही अजाणत्या स्वास्थ्य संकटांना रोखतात व सुरक्षितता निश्चित करतात. त्यापुढे, हे पूरक पदार्थ अॅमवेच्याच उत्पादन सुविधांमध्ये विकसित केले जातात, जेथे उत्पादनाची सुरक्षा, योग्य ओळख आणि उच्चतम गुणवत्ता राखण्यासाठी योग्य उत्पादन प्रक्रियांचे पालन केले जाते.
पारंपारिक वनस्पतिजन्य पोषक उत्पादनांच्या क्षेत्रातील वाढीबाबत बोलताना, अजय खन्ना, प्रमुख विपणन अधिकारी, अॅमवे इंडिया, म्हणाले, “भारतात, उपभोक्ता आरोग्याविषयी अधिकाधिक जागृत होत आहेत, आणि हा आरेग्याविषयीचा एकात्मिक दृष्टिकोणाचा मेगाट्रेंड अॅमवेच्या वाढीचा पुढच्या टप्प्याला चालना देईल. उभरत्या कलांच्या बरोबरच, वनस्पतिजन्य पोषण उत्पादनांसह आपण रोगप्रतिकारशक्तिला पूरक ठरणाऱ्या पोषण उत्पादनांच्या विक्रीत तीव्र वाढ अनुभवली आहे. आज उपभोक्ते वनस्पतिजन्य उत्पादनांसाठी एक शक्तिशाली प्रतिसाद दाखवीत आहेत, आणि विशेषकरून तरुणांमध्ये, पारंपारिक वनस्पतिजन्य साहित्यासाठी वाढती पसंती आहे. या सर्व कलांना लक्षात घेवून, आम्ही हे क्षेत्र 32% CAGR ने 2020 ते 2024 दरम्यान तिपटीने वाढण्याचा अंदाज बांधतो. अजून गतिमानता बनविण्यासाठी, नाविन्यपूर्ण उत्पादनांने, वेळोवेळी, बाजारातील गरजांच्या प्रमाणे नवीन लॉंचेसची शक्तिशाली मालिका ठेवून व तरुणाईशी नवीन व नाविन्यपूर्ण संवाद साधण्याच्या साधनांने आम्ही या क्षेत्राला बळ देणे चालूच ठेवू.”
यानंतर, पुरवठ्याबाबत बोलतांना, श्री. बुधराजांनी नमूद केले कि, “अॅमवे मध्ये आम्ही आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाशी बांधील आहोत आणि कच्चा माल हा भारतातील न्यूट्रिसर्ट प्रमाणित सेंद्रीय शेतांमधून मिळवून आम्ही एका स्वावलंबी भारताला आधार देतो. ही बाब आम्हाला उत्पादनांची गुणवत्ता कायम राखण्यासही मदत करते.”
वनस्पतिजन्य पोषण क्षेत्रातील आपली पकड बळकट करण्यासाठी, अॅमवे इंडिया एक अधिक शक्तिशाली भागीदारांचे जाळे बांधीत आहे, आपल्या भागधारकांच्या आयुष्यात एक जाणवणारा बदल करण्याच्या दृष्टिकोणाच्या अनुषंगाने. सध्या अॅमवे इंडिया ही 12 न्यूट्रिसर्ट प्रमाणित भागीदारां बरोबर उत्पादन सामग्री जशी बोसवेलिया, सिन्नामोन, गारसिनिया, जिंजर, जिम्नेमा, होली बॅसिल, बॅकोपा, झेंडू, डाळिंब, हळदी, आणि इतर गोळा करण्यासाठी काम करीत आहे. अलिकडे, वनस्पतिजन्य पोषक उत्पादनांच्या विक्रीतील वाढी बरोबर, अॅमवे इंडियाने वनस्पतींच्या अर्काच्या मागणीत एक तीव्र वाढ होताना पाहिली आहे. वाढत्या मागणीला पुरवठा करण्यासाठी, अॅमवे भारतातील आपला सेंद्रीय शेतीचा पाया वाढविण्याचा विचार करीत आहे. संस्था येत्या दोन वर्षात देशातील स्थानिक उत्पादनाला उत्तेजना देण्यासाठी प्रमाणित वनस्पति शेतांत आणखी वाढ करण्याचा विचार करीत आहे. अॅमवेची सेंद्रीय शेती उपयोजनातील गुंतवणूक ही स्थानिक अर्थव्यवस्था आणि मध्यम व छोट्या शेतकऱ्यांच्या जीवनमानातील परिवर्तनाला सहाय्यच करीत आहे.
