Thursday, September 3, 2026
PUNE

15 वर्षीय तंत्रकुशल तज्ज्ञाने विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचा विकास करणाऱ्या क्षमतेची केली निर्मिती

पुणे, दि. 7 – ऋषि  प्रभाकर इंटरनॅशनल फाऊंडेशन (आरपीआयएफ)च्या वतीने आज डिजीटल आरसीआरटी हा डिजीटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक कौशल्यांचा विकास करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या मंचाचे व्हर्च्युअल लॉन्च करण्यात आले. या कार्यक्रमाला डिजीटल आरसीआरटीचे सह-संस्थापक अरुंधती ऋषि  प्रभाकर आणि सिद्धांत ऋषि  प्रभाकर उपस्थित होते.   

डिजीटल आरसीआरटी या पुणे येथील ई-लर्निंग स्टार्टअपचे व्यवस्थापन आणि विकास सिद्धांत प्रभाकर स्वतंत्रपणे करतो आहे. रॅपिड कॉप्रीहेन्शन अँड रिव्ह्यू टेक्नी (आरसीआरटी) ची मूळ संकल्पना गुरुजी ऋषि  प्रभाकर (ऋषि  संस्कृती विद्या केंद्र) यांनी विकसीत केली होती. ही संकल्पना आणखी पुढे नेत त्यांचा मुलगा सिद्धांत ऋषि  प्रभाकर याने शिक्षण तंत्राला डिजीटल रूप देत ते डिजीटल आरसीआरटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले.

आरसीआरटी सेल्फ-लर्निंग टेक्नी असून त्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमातील एक विषय 8-10 दिवसांत समजून घेऊ शकतील. त्यामुळे शिक्षणाची पद्धत बहुढंगी आणि सुलभ होईल. या तंत्राला अनेक वैज्ञानिक प्रक्रियांचे पाठबळ आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक कौशल्य आत्मसात करताना आयुष्यभर पुरेल इतके ज्ञान संपादित करण्यास अतिरिक्त साहाय्य मिळेल.  

हा मंच लॉन्च करताना डिजीटल आरसीआरटी’च्या सह-संस्थापिका अरुंधती प्रभाकर म्हणाल्या की: “आमच्या आरसीआरटी लर्निंग तंत्राचे लॉन्चिंग करताना उत्साह वाटतो आहे. आम्हाला कायमच विद्यार्थ्यांच्या विकासाची काळजी होती. त्यातच कोविडमुळे शिक्षणविषयक क्षेत्रावर परिणाम झाला. या डिजीटल मंचावर अधिक सुलभ आणि झटपट शिकण्याची तंत्र विकसीत करण्यावर आमचा भर आहे. डिजीटल आरसीआरटी’च्या लॉन्चसह विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास स्वत: करण्याच्या दृष्टीने तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे स्वत:चा अभ्यास स्वत: करण्याच्या दृष्टीने तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, अल्पावधीत 100% अभ्यासक्रम त्यांना शिकता येईल याकडे लक्ष आहे.”

“प्रत्येक विद्यार्थ्यात उत्तम गुण संपादित करण्याची क्षमता आहे, असा विश्वास आम्हाला वाटतो. त्यांच्या विकासाकरिता प्रत्येक शैक्षणिक वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. आतापर्यंत पुस्तकांत बंद असलेला आरसीआरटी अभ्यासक्रम डिजीटल स्वरुपात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कोणत्याही अभ्यासक्रम व्यतिरिक्त क्रियाकलापांकरिता विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देता येईल.” असेही त्या पुढे बोलताना म्हणाल्या.

या संदर्भात माहिती देताना शिक्षक आणि सल्लागार डॉ. स्वरूप दत्ता म्हणाले की,  “आरसीआरटी’ने एक आमूलाग्र परिवर्तन यानिमित्ताने अधोरेखित केले. पूर्वीचे “शिक्षककेंद्री” शिक्षण हे आता “विद्यार्थीकेंद्री” झाले आहे. जिथे विद्यार्थी हे आता निर्णयात सक्रीय सहभाग घेणारे झाले आहेत. अशाप्रकारच्या पद्धतीमुळे आता विद्यार्थी केवळ ज्ञान शोषक राहणार नाहीत, तर ते ज्ञान निर्मिती करतील. गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. प्रामुख्याने शालेय मुलांसाठी! सिद्धांत याने आपल्या वडिलांचे द्रष्टेपण डिजीटल आरसीआरटी प्रोग्रामद्वारे उपलब्ध करून आणखी एक मजल मारली आहे. बालकांकडे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा अविश्वसनीय वेग असतो. मी स्वत: त्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजीटल आरसीआरटीची शिफारस करतो. आपण जे शिकतो, जे ज्ञान आत्मसात करतो त्यात सुयोग्य ताळमेळ राखण्याचा आत्मविश्वास या मंचाचा अवलंब केल्यास नक्कीच विद्यार्थ्यांत येईल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading