पदवीधर निवडणूक भाजपा, महाआघाडीने साखर कारखान्याची केली – प्रा.सुकुमार कांबळे
पुणे, दि. 25 – पदवीधर निवडणूक ही पदविधरांच्या प्रशांवर ,सुशिक्षित बेरोजगार यासारख्या विविध प्रश्नावर न होता,ऊस बिलाच्या प्रश्नावर हे उमेदवार चर्चा करीत आहेत , दोन साखर कारखानदार उमेदवार देऊन निवडणूक साखर कारखान्याची भाजपा ,महाविकास आघाडीने केल्याचा आरोप डेमोक्रोटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक प्रा.सुकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला .ते डेमोक्रोटिक पार्टीचे अधिकृत उमेदवार ऍड. संतोष कामाने यांच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की हे भाजप आनि राष्ट्रवादी व महाविकास आघाडी हे जातीयवादी पक्ष आहेत त्यांनी एकदाही दलित ,मुस्लिम यांना उमेदवारी दिली नाही.फुले ,शाहू ,आंबेडकर यांचा महाराष्ट्र अशी ओळख टिकवण्यासाठी आमच्या उमेदवराला मतदान करण्याचे आवाहन केले. शिवाय तरुण पदवीधर विचार करून या साखर सम्राटांना घरी बसवतील असा विस्वास् त्यांनी व्यक्त केला.
डेमोक्रोटिक पार्टीचे उमेदवार संतोष कमाने म्हणाले की ,समाजातील बरेच पदवीधर सद्ध्या बेकार आहेत.इंजिनिअर पासून ते विविध शाखेचे पदवीधर यांना रोजगार नाही .त्यामुळे आम्ही भविष्यात पदवीधर युवकांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आग्रही असणार असल्याचे आश्वाशन त्यांनी दिले. कारखानदार उमेदवाराला सर्वसामान्य तरुण मतदान करणार नसल्याचा विस्वास् त्यांनी व्यक्त केला .त्यामुळे पुणे विभागात यावेळी इतिहास घडणार असून आपला विजय निश्चित असल्याचा दावा कमाने यांनी केला .यावेळी शिवशाही व्यापारी संघटना ,लहुजी पँथर ,लहुजी समता परिषद यासह विविध सामाजिक संघटनांनी ऍड.संतोष कमाने यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
या वेळी पत्रकार परिषदेस प्रा.सुकुमार कांबळे ,उमेदवार ऍड. संतोष कमाने ,डेमोक्रोटिक चे प्रदेश सरचिटणीस संदीप ठोंबरे ,जनता क्रांती दलाचे अध्यक्ष सत्यवान कमाने ,अनिल हातागले,युवराज डाकले ,शीतल खरात,महादेव सकट ,दत्ताभाऊ केंगारे यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
