Friday, September 4, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येतली वाढ कायम

मुंबई, दि. 22 –  राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आज बऱ्याच दिवसांनी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 5 हजार 753 रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 60 रुग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले. राज्याचा Recovery Rate 92.75 एवढा झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 51 हजार 64 एवढी झालीय. राज्यात मृत्यूत आज घट दिसून आली. गेल्या 24 तासांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 17 लाख 80 हजार 208 एवढी झाली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून जग कोरोनासारख्या महासाथीचा सामना करीत आहे. काही देशांमध्ये शिथिल केलेलं लॉकडाऊन पुन्हा कडक केलं जात आहे. त्यात शाळादेखील पुढल्या वर्षी सुरू करण्याबाबत समर्थन दिलं जात आहे. याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर झाल्याची माहिती युनिसेफकडून दिली गेली आहे. पुढल्या वर्षात कोरोनाचा धोका कायम राहिल्यास एका पिढीचं भविष्य धोक्यात येईल, असा इशारा युनिसेफने दिला आहे. यासाठी युनिसेफने 140 देशांमध्ये पाहणी केली. या संशोधनानुसार सध्याच्या पिढीसमोर 3 प्रकारचे धोके दिसून आले आहेत. यामध्ये कोरोना महासाथीचा परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरीबी याशिवाय विषमतेचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading