बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन – कॉमेडियन भारती सिंह आणि हर्षला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई – घरात ड्रग्स सापडल्याप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाला अटक करण्यात आली होती. आज त्यांच्यावर मुंबई किल्ला कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने या दोघांनाही 14 दिवसांची म्हणजेच 4 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भारती आणि हर्ष यांच्या घरात ८६ ग्राम गांजा सापडला होता. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजूपत याच्या आत्महत्येप्रकरणामुळे बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण उजेडात आले. त्यानंतर बॉलिवूडविश्वातील अनेक सिने कालाकरांची नावेही पुढे आली होती. त्याचप्रकरणात एनसीबीने काल शनिवारी खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.

शनिवारी सकाळी एनसीबीच्या पथकाने भारती सिंहच्या घरी धाड टाकली. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने ही कारवाई केली. त्यानंतर भारती आणि हर्ष यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशीत भारतीने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: