पंढरपुरात विश्व वारकरी सेना व वंचितच्यावतीने मिठाई वाटून व आतिषबाजी करून जल्लोष साजरा
पंढरपूर – वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेना यांच्यावतीने प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “मंदिर प्रवेश” या पंढरपुरात झालेल्या विराट आंदोलनाला यश आले. त्याच पार्श्वभूमीवर काल सकाळी 6 वा पंढरपुरामध्ये नामदेव पायरी येथे वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेच्या वतीने मंदिर प्रवेश केला व दर्शन घेऊन जल्लोष व मिठाई वाटप करण्यात आले.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंददादा चंदनशिवे, माढा विभागाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ घाडगे देशमुख, सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे, विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे, ह.भ.प जगन्नाथ महाराज देशमुख-भोसले महाराज, ह.भ.प सुभाष बापू ओव्हाळ, माढा विभागाचे उपाध्यक्ष कुमार भाऊ बनसोडे, शशिकांत बनसोडे, सागर गायकवाड, रवी थोरात, सोहम खडतरे, बाबू बनसोडे, शशिकांत बनसोडे, दिलीप उबाळे, सुनील ओव्हाळ, विनोद तोरणे, विकास जाधव, सचिन सोनवणे, दीपक माने, रवी सर्वगोड, सुनील पगारे, सतीश जाधव, शरद जाधव, संजय बनसोडे, बाबुराव बर्थडे, दीपक लोंढे, सचिन काटे, अमित गाडे, दिपक जगधने, स्नेहल लोखंडे, आदी माढा विभाग पदाधिकारी वारकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
