बिहार – नितीश कुमार यांनी घेतली सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

पाटणा –   नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. नितीश कुमार या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. राज्यसभेचे उपसभापति हरिवंश ,पूर्व डिप्टी सीएम सुशील कुमार मोदी, मुख्य सचिव दीपक कुमार देखील उपस्थित होते. 

नितीश कुमार हे सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. नितीश कुमार यांच्यासह १५ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपच्या सात, जेडीयूचे ५, हम आणि व्हीआयपीच्या प्रत्येकी एक जणानं शपथ घेतली. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी ही शपथ दिली. नितीश यांच्यानंतर तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी  मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे दोघांची उपमुख्यमंत्रिपदावर त्यांची वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. या शपथविधी सोहळ्याला भाजपच्या दिग्गजांनी उपस्थिती लावली. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, बिहारचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. या शपथविधी सोहळ्यावर महाआघाडीनं बहिष्कार घातला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: