वंचित बहुजन आघाडीची पुणे शहर कार्यकारणी जाहिर; शहराध्यक्षपदी मुन्नवर कुरेशी

पुणे, दि. 15 – वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पुणे शहर कार्यकारिणी जाहीर केली. शहराध्यक्षपदी मुन्नवर कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे शहर कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल गुजर यांची तर उपाध्यक्ष म्हणून लक्ष्मण आरडे, प्रवीण गायकवाड, रामदास सोंडकर, विकास भेगडे, विकास साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. महेश कांबळे, जितेंद्र जाधव यांची महासचिव पदी तर विशाल कुदळे सचिव आणि मनोज क्षीरसागर यांनी सहसचिव म्हणून निवड झाली आहे. अभिजित शेलार – कोषाध्यक्ष, नकुल गोंधळे – सह कोषाध्यक्ष, गौरव जाधव – प्रवक्ता, संजय गायकवाड – प्रसिद्धी प्रमुख, आकाश गाणोरे – संघटक, सतीश रणवरे, विनोद शिंदे आणि संतोष समीदर – सहसंघटक, ऍड. मनोज माने – कायदेशीर सल्लागार तसेच राजकुमार परदेशी, मयूर शिंदे, गोरख गायकवाड,विजय खुडे, सांदीपान शेरखाने, दीपक ओव्हाळ, केतन साळवे, ऍड.अरविंद तायडे, सोमनाथ पानगावे, सुरेखा खंडारे, किशोर लष्करे, मंगेश खंडारे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: