दिवाळीमध्ये ‘ऑल-न्यू थार’च्या 1,000 गाड्यांचे वितरण देशभरात करण्यास ‘महिंद्रा’ सज्ज

मुंबई, दि. 13 – ‘ऑल-न्यू थार’च्या तब्बल 1,000 गाड्यांचे वितरण देशभरात दिवाळीच्या काळात करण्यास महिंद्रा अॅंड महिंद्रा कंपनी सज्ज झाली आहे. महिंद्रा अॅंड महिंद्रा ही कंपनी 19.4 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहातील प्रमुख कंपनी आहे.

दिवाळीच्या निमित्ताने ‘ऑल-न्यू थार’च्या महावितरणाचा कार्यक्रम आयोजित करून कंपनीतर्फे ग्राहकांना ‘हॅपी थार-इंग दिवाळी’ शुभेच्छा देण्यात येत आहेत. हे वितरण गाडीच्या उपलब्ध असलेल्या प्रकारांसाठी नोंदणी केलेल्या क्रमवारीवर आधारित आहे.

‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’च्या ‘ऑटोमोटिव्ह डिव्हिजन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाकरा म्हणाले, ‘ग्राहकांना आम्ही ‘हॅपी थार-इंग दिवाळी’ शुभेच्छा देत आहोत. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत दिवाळीच्या या शुभेच्छा पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यामुळेच 500 गाड्यांचे महावितरण देशभरात पार पडल्यानंतर आम्ही लगेचच हे 1000 गाड्यांचे महावितरण हाती घेतले आहे. यातून आम्ही दिवाळी साजरी करण्याची आणखी एक संधी ग्राहकांना देत आहोत.’’

कंपनीने ग्राहकांशी व्यक्तिगत पातळीवर संपर्क साधून गाडीच्या वितरणाच्या संभाव्य तारखा सांगण्यास सुरुवात केली आहे. प्रतीक्षा कालावधीतील प्रत्येक टप्प्यात ग्राहकांना ही वितरणाची अद्ययावत माहिती देण्याचे धोरण कंपनी राबवीत आहे. दरमहा 2 हजार गाड्यांचे उत्पादन करण्याचे कंपनीचे सुरुवातीचे नियोजन होते. आता येत्या जानेवारीपर्यंत ते 3 हजारावर नेण्याचे तिचे प्रयत्न सुरू आहेत.

‘थार # 1’ ही पहिलीवहिली गाडी ऑनलाईन लिलावात जिंकलेल्या आकाश मिंडा यांना गेल्या दि. 1 नोव्हेंबर रोजी ही गाडी सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर 7 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत 500 गाड्यांचे वितरण करण्यात आले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: