जेके सुपर सिमेंट तर्फे दिवाळीच्या निमित्ताने कोविड योद्ध्यांना, # यहपक्काहै– थॅंक यू डॉक्टर्स लघुपटाद्वारे मानवंदना
पुणे, दि. 13 – कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर असणाऱ्या योद्ध्यांना, विशेषतः डॉक्टरांना, जेके सुपर सिमेंट कडून मानवंदना देण्यात आली आहे. कोविडच्या काळात रुग्णांना वाचविण्याचे काम करीत असताना अनेक डॉक्टरांना बलिदान द्यावे लागले. आयएमए च्या एका अहवालानुसार सप्टेंबर २०२० पर्यंत २२३८ डॉक्टरांना कोविडची लागण झाली व ३८२ डॉक्टरांना प्राण गमवावे लागले आहेत.
कोविड-१९ शी झुंजणाऱ्या आघाडीवरील या योद्ध्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी जेके सुपर सिमेंट ने एक विशेष जाहिरात मोहीम चालवली आहे. #यहपक्काहै – थॅंक यू डॉक्टर्स या जाहिरातपटाची संकल्पना व निर्मिती ही सोशल क्लाऊड व्हेंचर्स या संस्थेच्या सहकार्याने साकार करण्यात आली आहे. डॉक्टरांचे अविरत कार्य, त्याग, सामर्थ्य, मानवतेसाठी ते करीत असलेली सेवा आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे योगदान यांबद्दल त्यांना सलाम करण्यात आला आहे.
या लघुपटात, एक डॉक्टर या नात्याने आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी एका महिलेने दाखवलेली चिकाटी व अतूट समर्पण, तसेच एक माता या नात्याने आपल्या मुलीप्रति काही जबाबदारी असतानाही केवळ वैद्यकीय व्यवसायाच्या निष्ठेपोटी केलेला त्याग आणि लाडक्या मुलीसोबत दिवाळी साजरी करता न येण्यामुळे तिला आलेली निराशा यांचे भावस्पर्शी चित्रण करण्यात आले आहे. अपनी खुशिया भूल कर, जो सबका अपनों जैसा साथ निभाते है, सलाम उन सभी डॉक्टर्स को, जो हर पल देश को सुरक्षित बनाते है या ओळीने हा व्हिडिओ संपतो. कोरोना साथीच्या काळात देशभरातील वैद्यकीय चिकित्सक करीत असलेले परिश्रम आणि अविरत प्रयत्न यांची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
नव्या लघुपटाविषयी बोलताना, जेके सिमेंट लिमिटेड’चे (ग्रे सिमेंट बिझिनेस) मार्केटिंग विभागाचे प्रेसिडेंट पुष्प राज सिंह म्हणाले, थँक यू डॉक्टर्स ‘#यहपक्काहै हा जाहिरातपट जेके सुपर सिमेंट चे धोरण आणि या ब्रॅंडचे आश्वासन प्रतिबिंबीत करतो. हा व्हिडिओ निरोगी आणि सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी लढत असलेल्या आघाडीच्या नायकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
जेके सुपर सिमेंट शी झालेल्या सहकार्याबद्दल बोलताना सोशल क्लाऊड चे संस्थापक निपुण अरोरा म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात आघाडीवर काम करणारे सर्वजण हे खऱ्या अर्थाने नायक आहेत. प्रत्येक नागरीक भावनिकदृष्ट्या जोडला जाईल, अशा या लघुपटाच्या माध्यमातून या नायकांना मानवंदना देण्यास आम्हाला अभिमानच वाटतो. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये डॉक्टर कशा प्रकारे निर्भयपणे त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, स्वतःचे आरोग्य, स्वतःचे हित आणि आनंद यांचा कसा त्याग करीत आहेत, यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
