पतित पावन संघटनेतर्फे पूर्व भागात आरोग्य तपासणी शिबीर

पुणे : पतित पावन संघटना, स्व-रूपवर्धिनी, आरोग्य भारती, समर्थ भारत पुनर्बांधणी योजना व ए.एस.जी.आय. हॉस्पिटल यांच्यातर्फे गुरुवार पेठेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबीरात सुमारे ४०० नागरिकांनी सहभाग घेतला होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक प्रशांत यादव, सुनील दाभाडे, हेमंत किराड, मंगेश शिंदे, नरेश आडेप, उमेश चव्हाण, किशोर राजपूत, प्रमोद राणा, रवींद्र बैताडे यांसह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राजाभाऊ राजपूत, स्वप्निल नाईक, अमित राजपूत, रोहित बलवार, मनीष खेडेकर, रुपेश गाढवे,ओंकार राजपूत, सागर बलवार, सचिन राजपूत व महेश बलवार यांनी शिबीराचे आयोजन केले होते. 
शिबिरात सर्दी, खोकला, आॅक्सिजन पातळी, डोळे, रक्तदाब, मधुमेह, वजन व रक्त तपासणी करण्यात आली. तसेच गरजेनुसार होमिओपॅथी गोळ्या आणि काढा देखील देण्यात आला. सन २०२० व २०२१ वर्षात कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगापासून बचावासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

Leave a Reply

%d bloggers like this: