पुणे पदवीधर मतदारसंघासाठी निशा बिडवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्राच्या संस्थापक अध्यक्षा निशा बिडवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थित अर्ज दाखल केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी ग्रॅज्युएट फोरमचे पदाधिकारी सुजाता कुबडे, मोनाली कुबडे, गायत्री बोरकर, अशोक एंडे, प्रभुराज पाटील, प्राचार्य बसवराज मठदेवरू आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना निशाताई बिडवे म्हणाल्या, “पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ग्रॅज्युएट फोरमच्या माध्यमातून कार्य करत आहे. विधानपरिषदेत जाऊन पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: