वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक !

महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध

पुणे,दि.२७ – पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये साखर आयुक्तांची उसाच्या भाववाढी संदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी ऊस कामगार, मुकादम, वाहतूकदार यांच्यासाठी लढा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी व प्रदेश अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांना पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अटक केली करून अज्ञात स्थळी नेले.

या बैठकीला विनायक मेटे, भाजपा आमदार सुरेश धस यांनाही निमंत्रण नव्हते, मात्र त्यांना ऐनवेळी प्रवेश देण्यात आला पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बैठकीला जाण्यापासून रोखण्यात आले.

या विरोधात जाब विचारल्यावर पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या या हुकूमशाही कृत्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: