कोरोना – राज्यात आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ४९६ रुग्ण बरे
पुण्यात 241 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई, दि.२७ : राज्यात आज ७,८३६ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३९ टक्के एवढे झाले आहे.
आज राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
राज्यात आज ११५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजर ०२८ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज रोजी एकूण १ लाख ३१ हजार ५४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुणे कोरोना अपडेट 27 ऑक्टोबर – मंगळवार…….-
दिवसभरात 241 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 639 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात 22 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. 03 रूग्ण पुण्याबाहेरील.
– 620 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 346 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 160086
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 6004
– एकूण मृत्यू – 4163
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 149919
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 2331