मन की बात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाला आज सहा वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी आज दसऱ्याच्या निमित्ताने मन की बातमधून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. दसऱ्याचा सण हा असत्यावर सत्याने मात करण्याचा सण तर आहेच शिवाय उत्सावाचं प्रतिक म्हणूनही हा सण साजरा केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आता सण उत्सवांचे दिवस येणार आहेत. या काळात खरेदी केली जाते. यावेळी खरेदी करताना वोकल फॉर लोकल हा संदेश जरूर लक्षात ठेवा. स्थानिक वस्तूंना प्राधान्य देऊन स्वदेशी वस्तूच खरेदी करा.

तसंच, यंदाच्या दिवाळीत एक दिवा आपल्या भारतीय सैन्यांसाठी लावण्याचेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या सणकाळात आपल्याला आपल्या सैन्यांचीही आठवण ठेवणं गरजेचं जे सणउत्सवात देशाची रक्षा करत आहेत. आपलं कर्तव्य बजावत भारतमातेची सेवा करत आहेत. त्यांची आठवण काढून आपल्याला सण साजरे करायचे आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत त्यांच्यासाठी एक दिवा लावायचा आहे.

तसंच, सण साजरे करताना शारीरिक अंतर पाळण्याचेही त्यांनी ‌आवाहन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: