देशात ५० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ६ लाख ६८ हजार अॅक्टिव्ह रुग्ण

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्गाचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसत असले, तरी देखील नवीन कोरोनाबाधित अद्यापही मोठ्या संख्येने आढळत आहेत. शिवाय, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ५० हजार १२९ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख ६४ हजार ८११ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ७८ लाख ६४ हजार ८११ कोरोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ६८ हजार १५४ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख ७८ हजार १२३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख १८ हजार ५३४ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

२४ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,२५,२३,४६९ नमूने तपासण्यात आले आहेत. तर, यातील ११ लाख ४० हजार ९०५ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: