कोरोना – राज्यात आज 6 हजार नवीन रुग्ण तर 5 हजार 648 कोरोना मुक्त
पुण्यात 292 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई , दि. 25 – राज्यात कोरोना रुग्णांचा घसरलेला आलेख अजुनही कायम आहे. रविवारी राज्यात 5,648 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 14,60,755 झाली आहे. तर राज्यात आज 6,059 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 45 हजारांवर गेली आहे. राज्याचा Recovery rate 88.8वर गेला आहे. तर 112 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे.
*पुणे शहर ..!
………
- दिवसभरात 292 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात 454 रुग्णांना डिस्चार्ज.
- 17 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
159698 - ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 6706
- एकूण मृत्यू – 4122
- एकूण डिस्चार्ज- 148870