fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

महापौर किशोरी पेडणेकर आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडला महिला कोविड योद्ध्यांचा सन्मान कार्यक्रम

मुंबई – नवरात्रीचे औचित्य साधत गामा फाऊंडेशन प्रस्तुत पूजा इंटरटेनमेंटच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या “सलाम कोरोना योद्ध्यांना’ या लाईव्ह कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि महापौर किशोरी पेडणेकर ह्यांच्या उपस्थितीत एकुण १८ कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या, खास करून कोविड काळात आपले कर्तव्य बजावणा-या रणरागिणींचा सन्मान झूम वेबिनारद्वारे करण्यात आला.

ह्या वेबिनारची शोभा वाढवताना खा. सुप्रिया सुळे ह्यांनी सर्व सन्मानार्थी महिलांना मानाचा मुजरा केला. त्याचप्रमाणे महापौर किशोरी पेडणेकर ह्यांनी सर्व स्त्रियांचे अभिनंदन करत स्त्रीशक्तीवर आपले मनोगत व्यक्त केले. शिवाय मुंबई युनिव्हर्सिटीच्या गोल्ड मेडलिस्ट पुजा अनिल रसाळ ह्यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभली. ‘सलाम कोरोना योद्ध्यांना’ या वेबिनारमध्ये जे. जे हॉस्पिटलच्या डीन डॉ.पल्लवी सापळे यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच, स्मिता कुडतरकर (परिचारिका), स्वाती ओळकर (पॅथोलॉजिल्ट(, गीतांजली शेट्टी (केमिस्ट ), अनुराधा पोतदार-जव्हेरी(नगरसेविका)मृणाल पेंडसे (नगरसेविका), सरिता चव्हाण इन्स्पेक्टर, एैश्वर्या अस्थाना ( उद्योजिका),  स्नेहा वाघ(प्राणी प्रेमी), मनीषा मराठे (रिक्षाचालक),  मुमताज काझी, मनीषा म्हस्के (मोटरमन), कामिनी शेवाळे (समाजसेविका), शोभा कांबळे (सफाई कामगार ), दिशा जोशी (अन्नपूर्णा) या महिलांबरेबरच पत्रकारिता क्षेत्रातील रश्मी पुराणिक (फील्ड रिपोर्टर,एबीपी),मनाली पवार (निवेदिरका न्यूज १८) आणि टीव्ही ९ ची छायाचित्रकार कविता गिरी ह्यांना सन्मानित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक फोंडा घाट आणि केक अँड कॅरी असून, पूजा इंटरटेनमेंटच्या आदित्य सरफरे यांचे विशेष योगदान होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading