तेजस्विनी पंडितने दिली भारतीय सैनिकांना आदरांजली

अवघ्या जगाला 2020मध्ये कोरोनाचा भयंकर आजार देणा-या चीनने गलवान खो-यात भारतीय सैनीकांवर भ्याड हल्ला केला होता. भारतीय सैन्याने त्यानंतर चीनला पळता भुई थोडी केली. देशाच्या करोडो जनतेचे संरक्षण करणा-या ह्या भारतीय सैन्याला अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या सातव्या दिवशी Illustration फोटोच्या माध्यमातून आदरांजली दिली आहे.

रणरागिणीच्या त्वेषाने शत्रूच्या चिंधड्या करणारी तेजस्विनी पंडित पाहून, काली मातेचाच भास होतो आहे. तेजस्विनी पंडित म्हणते, “महासत्ता बनण्याची स्वप्न पडू लागलेल्या चीनने भारताला आगीतून फुफाट्यात लोटलं. आधीच कोरोनाच्या आगीत होरपळत होतो, त्यात ऐन लॉकडाऊनमध्ये भारतीय सैनिकांवर त्यांनी ज्यापध्दतीने हल्ला केला आणि त्यांना ज्याप्रकारे छळून मारलं. ते ऐकुन हृदय पिळवटून जाते. पण असे भ्याड हल्ले परतवायला समर्थ असलेल्या भारतीय सैन्यानेही हे आक्रमण यशस्वीपणे परतवून शत्रूला धूळ चारली. आज त्यांच्यामूळेच आपण घरात सुरक्षित राहू शकतोय.”

तेजस्विनी पंडित पूढे सांगते, “अख्खा देश स्वत:ला ‘सेफ’ ठेवण्यासाठी घरी बसलेला असताना आपले प्राण देशासाठी अर्पण करणा-या, आपल्यासाठी मरणयातना भोगायला मागे-पुढे न पाहता लढणा-या, भारतीय सैनिकांच्या ऋणातून मुक्त होणं, शक्य नाही. पण त्यांना ही आदरांजली.”

Leave a Reply

%d bloggers like this: