शेवगाव रेडलाइट परिसरातील देह विक्रय करणाऱ्या 4 महिला कोरोना पॉझिटिव्ह

शेवगाव (नगर) – महाराष्ट्रात अजूनदेखील कोरोना महामारीचे संकट मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे, त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आतापरेंत 1430 कोरोना रुग्णाची झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात, शेवगाव तालुक्यातील रेड लाइट क्षेत्रातील 4 देहविक्री करणाऱ्या महिलांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

शेवगाव तालुक्यामध्ये देखील राज्य सरकारचा “माझे कुटुंब माझी जबाबदारी”हा उपक्रम अगदी सक्रियपणे राबविला जात आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून शेवगावच्या रेड-लाईट क्षेत्रासह सर्व भागात कोविड चाचणी करण्याचे कार्य माघील काही दिवसांपासून सातत्याने चालू आहे . शेवगाव नगर परिषदेकडून ह्या कोविड चाचण्या घेण्यात आल्या असून रेड लाईट भागातील 4 देहविक्री करणाऱ्या महिलाना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांना शेवगावमधील रुग्णालयात पुढील उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.

या विषयाची माहिती देताना श्रीमती सलमा हिरानी (तालुका आरोग्य अधिकारी ) म्हणाल्या, “रेड लाईट भागातील 4 देहविक्री करणाऱ्या महिलांना कोरोना संसर्ग झाल्याचे कोरोना चाचणीतून समोर आले आहे. आणि सदर प्रकरणांची आम्हाला माहिती आहे. सध्या आमची प्राथमिकता ही आहे कि ह्या महिलांना पुढील उपचारा करिता रुग्णालयात दाखल करणे . त्यानंतर आपण पुढील काही दिवसात हा परिसर प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करू आणि वाढणाऱ्या संक्रमणास आळा घालण्याचे मार्ग शोधू. तसेच आम्ही असे करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलणार आहोत. ”

रेड-लाइट क्षेत्र हे निवासी क्षेत्राच्या अगदी जवळच असल्याने सर्वसामान्य नागरिक आपल्या रोजच्या उपजीविकेचे सामान घेण्यासाठी दुकानात बाजारात ह्याच रस्त्याने रोज ये जा करत असतात तसेच देहविक्री करणाऱ्या महिला देखील ह्याच दुकानात साहित्य घेण्यासाठी वारंवार दुकानात येत असतात त्या मुळे स्थानिक लोक आणि नागरिक यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण ह्या परिस्थिती मध्ये देखील देहविक्री व्यवसाय हा सातत्याने चालूच आहे. ग्राहक रोज मोठ्या संख्येने येत आहेत परंतु त्यांच्या तोंडाला मास्क देखील नसतात आणि दारू पिऊन नशेत ग्राहक संपूर्ण परिसरात मोकाट फिरत असतात अशा सर्व कारणानं मुळे परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेबद्दल त्यांचे मत सामायिक करताना, तेथील रहिवाशांनी नमूद केले की कोरोना महामारी असून देखील देहविक्री व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. परंतु याच काळात सर्व शाळा, महाविद्यालये आणि अजून देखील बरेच व्यवसाय हे कोविडच्या भीतीने बंदच आहेत. त्या मुळे देहविक्री हा व्यवसाय अत्यावश्यक सेवेत तर मुळीच येत नाही आणि शासनाच्या नियमाप्रमाणे कुठले सामाजिक अंतर पाळून देखील होत नाही. मग जर ह्या व्यवसाय मुळे सर्वसामान्य नागरिक लोक यांच्या जीवाला ह्या कोरोना महामारी आजाराचा मोठा धोका असेल तर हा परिसर कोविड हॉटस्पॉट होण्या पासून वाचवण्या साठी आम्ही सर्व स्थानिक साहिवासी ,नागरिक शेवगाव स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाला अशी विनंती आणि मागणी करतो कि हे क्षेत्र कोविड हॉटस्पॉट होण्या पासून टाळण्या करिता आणि रेड लाईट परिसर कोरोना महामारीवर ठोस औषध उपचार निघे परियंत पूर्ण पणे बंद ठेवण्यात यावे आणि शासनाने या भागातील वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी योग्य त्या उपाय योजना करून त्यांना किमान दोन वेळच्या जेवणासाठी धान्य पुरवठा करून देण्यात यावा. किंवा मग दुसरा काही पर्यायी व्यवसाय उपलबध करून देण्यात यावा जेणे करून त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: