ओऍसिस फर्टिलिटी या पुण्यातील पहिल्या प्रगत तंत्रज्ञान आधारित वंध्यत्व निवारण केंद्राचा शुभारंभ

पुणे, दि. २३ – : मुले होण्याचे घटते प्रमाण ही महाराष्ट्र राज्यात एक गंभीर समस्या बनली आहे. राज्यात २००५ मध्ये असलेले २.८ हे प्रजननाचे प्रमाण (fertility rate ) कमी होऊन २०२० मध्ये १.७ वर आले आहे. सर्वसाधारणपणे लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाण १:१ असे राखले जाण्यासाठी प्रत्येक जननक्षम स्त्री ला दोन किंवा अधिक मुले होणे आवश्यक मानले जाते( 2.1 replacement rate). मात्र महाराष्ट्रात आज स्त्रिया आणि पुरुष या दोघांमधील वंध्यत्वाची मोठी समस्या उभी राहू पाहते आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, विकसित राष्ट्रांत दर चार जोडप्यांपैकी एक वंध्यत्वाच्या समस्येने ग्रासलेले असते. भारतात आज ज्यांना मूल होऊ शकत नाही अशी २ कोटी ७५ लाख जोडपी आहेत. मात्र यांपैकी एक टक्का जोडपी उपचारासाठी सल्ला घेतात. वंध्यत्व निवारणाच्या उपचारांची माहिती नसणे आणि कृत्रिम गर्भधारणा यशस्वी होण्याचे प्रमाण कमी असते हा गैरसमज ही याची मुख्य कारणे आहेत. प्रजननाचे सरासरी प्रमाण (स्त्री जननक्षम वयात किती मुलांना जन्म देऊ शकते) १९९० मध्ये ३.९ होते ते कमी होऊन २०१३ मध्ये २.३ वर आले आहे. स्त्रियांमधील दोषांमुळे असलेल्या वंध्यत्वाचे प्रमाण ४०-५० टक्के असल्याचा अंदाज आहे. मात्र पुरुषांमधील दोषांमुळे जोडप्याला मूल न होण्याचे प्रमाण वाढत चालले असून सध्या ते ४०-५० टक्के आहे.

पुण्यातील ओऍसिस फर्टिलिटी सेंटर च्या उदघाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हॉस्पिटल च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. “ही एक काळाची गरज आहे, कारण अनेक जोडपी आईबाबा होण्याचे स्वप्न पाहत असतात पण अपत्यप्राप्तीपासून वंचित राहतात. ओऍसिस फर्टिलिटी चे डॉ निलेश यांच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे अशा जोडप्यांचे अपत्यप्राप्तीचे स्वप्न पुरे होऊ शकेल याची मला खात्री आहे.”

सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी या समारंभाच्या निमित्ताने एक सुंदर व्हिडीओ संदेश पाठवून ओऍसिस फर्टिलिटी च्या टीम चे अभिनंदन केले. “ओऍसिस हा वाळवंटात जिथे हिरवळ फुलते असा प्रदेश असतो त्याप्रमाणेच पुण्यातील विनापत्य जोडप्यांच्या जीवनात ओऍसिस फर्टिलिटी मुले चैतन्य येईल,” असे त्या म्हणाल्या. व तसेच सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले कोल्हापूर चे पोलिस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे आणि कोल्हापूर च्या महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनीही ओऍसिस फर्टिलिटी च्या टीम चे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

ओऍसिस फर्टिलिटी च्या सह-संस्थापक आणि वैद्यकीय संचालक डॉ दुर्गा राव म्हणाल्या, पुण्यात हे फर्टिलिटी सेंटर सुरु करण्यामागे विनापत्य जोडप्याना एक मार्ग उपलब्ध करून देणे एवढाच उद्देश नव्हता, तर नैतिकतेच्या आधारावर, पारदर्शक पद्धतीने आणि वैद्यकशास्त्राचे नियम आणि उपचारपद्धती अनुसरून अशा जोडप्यांवर उपचार करणे हेही महत्त्वाचे आहे. आम्ही ओऍसिस मध्ये क्लिनिकल प्रोटोकॉल पाळून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उपचार करतो आणि म्हणूनच आमच्या प्रयत्नांना यश येण्याचे प्रमाण मोठे आहे.” विनापत्य जोडपे उपचारांची सुरुवात किती लवकर करते यालाही या प्रक्रियेत मोठे महत्त्व आहे हे डॉ. राव यांनी आवर्जून सांगितले. “अनेक जोडपी उपचार घेण्यात विलंब करतात . अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, जोडप्यातील दोघांचे वय ३० पेक्षा जास्त असेल आणि वर्षभर प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर डॉक्टरांच्या साह्याने प्रजनन तंत्रज्ञानाची मदत शक्य तेवढी लवकर घेतली पाहिजे ,” असे त्या म्हणाल्या .

ओऍसिस फर्टिलिटी चे सायंटिफिक हेड आणि क्लिनिकल एम्ब्रायोलॉजिस्ट डॉ. कृष्ण चैतन्य म्हणाले , भारतात वंध्यत्व निवारण उपचार फक्त महिलांवर होऊ शकतात असा मोठा गैरसमज असल्यामुळे ज्यांना उपचारांची गरज आहे असा मोठा पुरुषवर्ग वगळला जातो. जर्नल ऑफ रीप्रॉडक्टिव्ह सायन्सेस या प्रकाशनाच्या मते भारतात ५० टक्के वंध्यत्वाच्या केसेस पुरुषाच्या जनन क्षमतेतील दोषांमुळे उदभवतात. म्हणूनच एखादे जोडपे उपचारांसाठी येते तेव्हा पुरुषांमधील वंध्यत्वाचेही संपूर्ण मूल्यमापन झाले पाहिजे. ओऍसिस फर्टिलिटी च्या अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि उपचारप्रणाली यांच्या अत्युच्च गुणवत्तेबद्दल आम्हाला अभिमान आहे. उपचारांच्या प्रक्रियेत प्रयोगशाळेचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि येथे सर्वोच्च दर्जा राखला जाईल याची आम्ही दक्षता घेतो. परिपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन या तत्त्वावर चालणा -या भारतातील अगदी थोड्या प्रयोगशाळांपैकी आमची एक आहे आणि त्यामुळे आमहाला डॉक्टरांच्या साह्याने वापरल्या जाणा-या प्रजनन तंत्रज्ञानाततून मिळणा-या यशाचे प्रमाण मोठे आहे .

इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टीम, PGT-A, IVM अशा नव्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत ओऍसिस फर्टिलिटी नेहमीच आघाडीवर राहिले आहे. लवकरच आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचाही वापर सुरु करणार आहोत. अंड्रोलाईफ हा पुरुष प्रजनन क्षमतेची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र विभाग असलेले आमचे हॉस्पिटल भारतातील पहिले हॉस्पिटल आहे. कृत्रिम गर्भधारणेचा आधी घेतलेला उपचार अयशस्वी ठरलेल्या जोडप्यांवर उपचार करणे हे ओऍसिस चे खास कौशल्य आहे. अनेकदा विनापत्य जोडप्याना ‘शेवटचा उपाय’ म्हणून कृत्रिम गर्भधारणेचा मार्ग सुचवला जातो आणि तो अयशस्वी ठरला तर त्यांचे भावविश्व उद्ध्वस्त होते.
PGS, Vetrification, micro-TESE अशा आधुनिक तंत्रांच्या साह्याने कृत्रिम गर्भधारणा यशस्वी होण्याचे प्रमाण वाढू शकते. आधी घेतलेला कृत्रिम गर्भधारणा उपचार अयशस्वी ठरलेल्या अनेक जोडप्यांवर आम्ही ओऍसिस मध्ये उपचार केले आहेत आणि गर्भधारणेचे प्रमाण वाढवण्यात आम्हाला यश आले आहे. प्रशिक्षित, अनुभवी डॉक्टर आणि अत्याधुनिक सोयी यामुळे सर्व प्रकारचे प्रगत उपचार एकाच ठिकाणी करणे आम्हाला ओऍसिस फर्टिलिटी मध्ये शक्य झाले आहे. या शुभप्रसंगी ओऍसिस फर्टिलिटी चे क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ निलेश बलकवडे म्हणाले, “अधिकाधिक घातक होत चाललेले जीवनशैलीतील बदल आहेत, लग्ने उशीरा होणे, नोकरी-व्यवसाय करणा-या महिलांचे वाढते प्रमाण , व्यायामाचा अभाव, फास्ट फूड सेवन, मद्य आणि तंबाखूचे सेवन आणि लठ्ठ पणाचे वाढते प्रमाण यामुळे वंध्यत्व अधिक प्रमाणात येत आहे. उच्चशिक्षित महिला लग्न आणि अपत्यजन्म दोन्ही लांबणीवर टाकण्याची शक्यता जास्त असते. करिअर आणि कामाचा पसारा यामुळे त्या कुटुंबाचा आकारही लहान ठेवतात. वंध्यत्वाची समस्या आता शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागांतही प्रकर्षाने दिसू लागली आहे. आमच्या कडे तपासणीसाठी येणा-या जोडप्यांमध्ये ग्रामीण भागांतील जोडप्यांची संख्या मोठी आहे. “
ते पुढे म्हणाले की , गर्भनलिकेतील दोष (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ) , क्षय, आणि पेल्विक इन्फ्लेशन या समस्यांचे प्रमाण धक्कादायक आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम चे भारतातील प्रमाण (४-२५ टक्के)जागतिक सरासरीपेक्षा (५-१० टक्के) कितीतरी जास्त असल्याचे पाहण्यांमध्ये आढळून आले आहे. भारतात ४८ टक्के पुरुष धूम्रपान करतात. हे प्रमाण इंग्लंड आणि अमेरिकेतील धूम्रपान करणा -या पुरुषांपेक्षा जास्त आहे. धूम्रपानामुळे शुक्राणूंचे प्रमाण आणि ताकद घटते हे सर्वज्ञात आहे .

Leave a Reply

%d bloggers like this: