माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

नवी दिल्ली, दि. २३ – भारताचे महान क्रिकेटर आणि देशाला पहिला विश्वविजेता करणारे कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीत दाखल करण्यात आले आहे.

सध्या कपिल देव यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. कपिल देव यांच्या तब्येतीविषयीचे वृत्त आल्यानंतर ते लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करु लागले आहेत.

कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखालील संघाने भारताला पहिल्यांदा १९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकून दिला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: