fbpx
Monday, June 17, 2024
Business

होंडा टुव्हीलर्स इंडियातर्फे सणांच्या सेलिब्रेशनची सुरुवात

रू. 11,000 च्या बचतीसह* होंडा सुपर 6 ऑफर जाहीर!

पुणे –  होंडा टुव्हीलर्स इंडियाने आगामी सणांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी होंडा सुपर 6 ऑफर जाहीर केली आहे. ग्राहकांसाठी सर्वोत्तम बचतीचा मिलाफ साधत होंडा टुव्हीलर्स इंडियाने 6 आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या असून ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी त्याअंतर्गत 11,000 रुपयांपर्यंतची बचत करता येणार आहे.

ग्राहकांसाठीच्या ऑफर्सविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, सध्याच्या न्यू नॉर्मल परिस्थितीमधे कित्येक नवे ग्राहक प्रवासासाठी स्वतःचे वाहन निवडताना विशेषतः सार्वजनिक वाहतुकीऐवजी दुचाकीला पसंती देताना दिसत आहेत. यंदाचा सणासुदीचा हंगाम आजपर्यंतचा सर्वात वेगळा असल्यामुळे होंडाने आपल्या सर्व नेटवर्कमधे सुरक्षेस प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्वसमावेशक निर्जंतुकीकरणसुरक्षित अंतर राखणे अशा उपायांमुळे ग्राहकांच्या विश्वासातही भर पडत आहे. नवरात्री सुरू झाल्यापासून आमच्या दालनांतील वाहनासंबंधीच्या चौकशीआरक्षण तसेच टेस्ट राइड्सचे प्रमाण वाढले आहे. या सणासुदीच्या काळात होंडा आपल्या ग्राहकांना अतिरिक्त वाजवीपणा आणि आकर्षक बचत मिळवून देण्याची बांधिलकी जपणार आहे. आमच्या विस्तारित बीएस- व्हीआय श्रेणीबरोबरच ग्राहकांना होंडाच्या सुपर 6 ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. होंडा टुव्हीलर्सच्या ग्राहकांसाठी हा 11,000 रुपयांच्या मोठ्या बचतीसह त्यांची आवडती होंडा दुचाकी घरी घेऊन जाण्यासाठी ही सर्वात योग्य वेळ आहे.

रिटेल वित्त योजनांद्वारे 11,000 रुपयांची बचत

वाजवी किंमत आणि खऱ्या अर्थाने मनःशांती मिळवण्यासाठी होंडाचे ग्राहक आता त्यांच्या गाडीच्या मूल्याच्या 100 टक्के वित्त सहाय्य मिळवू शकतात. 7.99 टक्क्यांपासून पुढे असलेला आतापर्यंतचा सर्वात कमी व्याजदर आणि पहिल्या तीन महिन्यांसाठी ईएमआयवर 50 टक्क्यांची सवलत त्यांच्या बचतीमधे भर घालेल.

ग्राहकांना आता होंडाच्या विविध वित्त भागिदारांकडून अर्थसहाय्य मिळवता येणार असून त्यात आयडीएफसी फर्स्ट बँक, एल अँड टी फायनान्शियल सर्व्हिसेस, इंडसइंड बँक, मुथ्थुट कॅपिटल, चोलामंडलम फायनान्स, टाटा कॅपिटल टुव्हीलर लोन्स यांचा समावेश आहे.

क्रेडिट आणि डेबिट कार्डावर 5000 रुपयांपर्यंतचा कॅश- बॅक

होंडा आपल्या ग्राहकांना क्रेडिट किंवा डेबिट कार्डावरून खरेदी केल्यास 5000 रुपयांपर्यंतचा सुपर कॅशबॅक देणार आहे. ही ऑफर ग्राहकांना ईएमआयवरील कॅशबॅकसारखा फायदा देणार असून त्याचबरोबर खरेदीची प्रक्रिया हायपोथिकेशनचा कोणताही त्रास होणार नाही अशाप्रकारे सहज व तत्काळ असेल. ही योजना आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बदोडा, येस बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि फेडरल बँक या पाच बँकांच्या क्रेडिट कार्ड ईएमआयवर लागू (मासिक हप्त्यासमान) असेल. बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी ईएमआय पर्यायाशिवाय 5 टक्के कॅशबॅकची ऑफरही मिळणार आहे. त्याशिवाय आयसायसीआयचे ग्राहक डेबिट कार्ड ईएमआयवर कॅशबॅक मिळवू शकतील. होंडा ग्राहकांना पेटीएमच्या माध्यमातूनही 2500 कॅशबॅकचा लाभ मिळणार आहे.

या सणांच्या काळात होंडा कुटुंब सर्वांच्या सुरक्षिततेसह आनंदाचा हा सण साजरा करणार आहे. बचतीसह संपर्कविरहीत खरेदी प्रक्रियेची खात्री असून होंडाचे ग्राहक त्यांची आवडती होंडा दुचाकी होंडाच्या सुरक्षित व सोप्या ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मद्वारे  (https://www.honda2wheelersindia.com/BookNow) आपल्या घरीच राहून पूर्ण करू शकतील. क्लिक करा, बुक करा आणि निवांत व्हा. त्याशिवाय होंडा कुटुंब आपल्या सर्व नेटवर्क टचपॉइंट्समधे ग्राहकांना मास्क, सुरक्षित अंतर राखणे अशाप्रकारचे उपाय अवलंबण्यासाठी विनंती करत आहे.

होंडा जॉय क्लबचे सामान्य फायदे

खरेदीचा आनंद खरेदी केल्यानंतरही घेता येणार आहे. ग्राहकांना होंडा जॉय क्लब या दुचाकी क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाच्या डिजिटल लॉयल्टी प्रोग्रॅममध्ये सहभागी होऊन विविध फायदे, बक्षिसं आणि असामान्य लाभ मिळवता येणार आहे. केवळ 349 रुपये भरून सदस्यत्व घेता येणार असून त्याबदल्यात मिळणाऱ्या फायद्यांच्या लांबलचक यादीत मोबीक्विकवर 200 रुपयांचा कॅशबॅक, 340 रुपयांच्या होंडा करन्सीचे क्रेडिट आणि एक लाख रुपयांचा अपघाती विमा यांचा समावेश आहे. होंडा जॉय क्लब सदस्य या नात्याने ग्राहकांना गाडीचे सर्व्हिसिंग, सुटे भाग, लेबर शुल्क, मोफत पिकअप अप आणि ड्रॉप इत्यादी सेवा होंडाच्या नेटवर्कमधे मिळतील. त्याशिवाय रिफरलसाठी बनस पॉइंट मिळवता येतील किंवा त्यांची सध्याची होंडा दुचाकी बदलून घेता येईल. इतकेच नाही, तर मिळालेले पॉइंट्स होंडाशिवाय इतरत्र म्हणजे लाइफस्टाइल, अपॅरल, रेस्टॉरंट्स, फार्मसी, मनोरंजन आणि कल्याण ज्वेलर्स अशा 30 ब्रँड्समधे खर्च करता येतील.

विशिष्ट कर्ज रक्कम आणि बाजारपेठेतील सर्वसामान्य योजनेचा कालवाधी यावरून बचतीची आकडेमोड. बचतीची रक्कम कर्जाची रक्कम आणि कालावधईनुसार बदलू शकते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading