सेको टूल्सचा लीला पुनावाला फाउंडेशन सोबत सामंजस्य करार

पुणे, दि. १९ – ९ ऑक्टोबर हा दिवस लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) साठी खास होता. एलपीएफने २५ वर्षे पूर्ण केली आणि सेको टूल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समवेत सामंजस्य करार करून आपला रौप्यमहोत्सव साजरा केला.
४ वर्षांच्या भागीदारीसह सेको टूल्सने आपली वचनबद्धता स्वीकारली आहे. यामध्ये एलपीएफच्या स्कूल प्रोजेक्ट टूमारो टूगेदर प्रकल्पा अंतर्गत ११ वी व १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिकणार्‍या ७० मुलींना मदत केली जाईल. यात शिष्यवृत्ती सोबतच कौशल्य विकास कार्यक्रम, करिअर समुपदेशन आणि सेको टूल्स कर्मचारी स्वयंसेवक कार्यक्रमांद्वारे या मुलींना मार्गदर्शन केले जाईल. एशिया पॅसिफिकचे उपाध्यक्ष, एमडी-सेको टूल्स इंडिया- नॉर्बर्ट कॉनिग यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली . यावेळी एलपीएफ प्रमुख लीला पुनावाला, संस्थापक विश्वस्त फिरोज पुनावाला आणि एलपीएफच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती खरे यांच्या उपस्थितीत होते.
यावेळी पद्मश्री लीला पुनावाला म्हणाल्या “ही पहिलीच वेळ आहे की आमचा एक पार्टनर आमच्या ज्युनियर कॉलेजच्या मुलींना पाठिंबा देत आहे. सेको टूल्सची मी मनापासून कृतज्ञ आहे. माझा विश्वास आहे की या मुलींमध्ये व्यक्ति-विकास करण्याची आणि त्याच्यांत महत्वकांक्षा निर्माण करण्याची ही खरोखरच योग्य वेळ आहे. यामुळे या मुली योग्य मार्गावर पुढे जातील आणि पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यावरही लक्ष केंद्रित करतील. ” नॉर्बर्ट कॉनिग “ज्युनियर कॉलेज स्कुल प्रोजेक्ट अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींना पाठिंबा देण्याची आमच्यासाठी ही सर्वात योग्य वेळ आहे. ज्या मुलींना आम्ही समर्थन देत आहोत त्या प्रभावी वयात आहेत आणि त्यांच्या आयुष्यात आज योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. आम्ही ज्या मुलींना समर्थन देत आहोत, त्या सेको टूल्सच्या विविधता, लिंग समानता आणि सर्वसमावेशकता या दृष्टिकोनाशी सुसंगत असतील. या उपक्रमासाठी आम्ही लीला पुनावाला फाउंडेशनबरोबर भागीदारी केल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. “

या प्रकल्पाव्यतिरिक्त, सेको टूल्स पदवीपूर्व शिष्यवृत्ती अंतर्गत अभियांत्रिक शिक्षण घेणार्या मुलींना समर्थन देत आहे. ज्यात शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासासाठी देखील एलपीएफला समर्थन देत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: