लिओ व लायन्स क्लब पुना गणेशखिंडच्या वतीने रिक्षा पार्टिशन किट वाटप

पुणे, दि.१८ – कोरोना महामारीमुळे रिक्शा प्रवाशी व चालक यांच्यात प्रत्यक्ष संपर्क झाल्यास कोरोना प्रसाराची शक्यता असते.म्हणून ग्राहक व रिक्शाचालक दोन्ही सुरक्षित राहावे यासाठी लायन्स क्लबच्या मार्गदर्शना खाली लिओ क्लब ऑफ पुना गणेशखिंडने १० रिक्षाचालकांना पार्टिशन किट वाटले.तसेच ५ गरजू मुलांना ऑनलाइन अभ्यासास मदत म्हणून इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज शाळेला स्मार्टफोन उपलब्ध करून दिले.या प्रसंगी लिओ क्लबचे अध्यक्ष लिओ चिराग लोया,सचिव प्रणव अगरवाल,लिओ सल्लागार ला.दीपक लोया,लायन्स क्लब ऑफ पुना गणेशखिंडचे अध्यक्ष ला.ज्योतीकुमार अगरवाल,सचिव ला.महेंद्र गदिया आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: